पुलाची शिरोली / वार्ताहर
कोव्हीड – १९ च्या पार्श्वभूमीवर कोल्हापूर जिल्हा आरोग्याच्या सक्षमीकरणासाठी जिल्ह्याचे पालकमंत्री ना. सतेज पाटील, आमदार चंद्रकांत जाधव आणि जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी प्रशासनाला कोल्हापुरातील उद्योजकांनी मदतीचा हात द्यावा असे आवाहन केले होते. या आव्हानाला प्रतिसाद देत शिरोली मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशनच्या (स्मॅक) आग्रहास्तव या सामाजिक उपक्रमात व्हर्साटाईल ग्रुपच्यावतीने चेअरमन सुनिल जनवाडकर व व्यवस्थापकीय संचालक यतीन जनवाडकर यांनी फिलिप्स मेक अद्यावत व्हेंटिलेटर पालकमंत्री सतेज पाटील यांच्याकडे रुग्णसेवेसाठी सुपूर्द केला. यावेळी पालकमंञी पाटील यांनी कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक यतीन जनवाडकर यांचे अभिनंदन केले. यापूर्वी उद्योजकांनी प्रशासनाला सुमारे सत्तर लाखाचे दहा व्हेंटिलेटरस प्रदान केले आहेत.
याप्रसंगी शिरोली मॅन्युफॅक्चर्स असोसिएशनचे अध्यक्ष अतुल पाटील, कोषाध्यक्ष एम. वाय. पाटील,व्हर्साटाईल ग्रुपचे सी. ई. ओ. राजेश चंदन, कोल्हापूर चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीजचे अध्यक्ष संजय शेटे, मानद सचिव धनंजय दुग्गे, नगरसेवक राहुल माने, सचिन चव्हाण, तोफिक मुलानी आदी मान्यवर उपस्थित होते.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव









