युपी एस.सी परिक्षा उत्तीर्ण अश्विन गोळपकर याचे प्रतिपादन
प्रतिनिधी/ रत्नागिरी
शाळेत असताना जिल्हाधिकाऱयांच्या हस्ते पुरस्कार स्विकारण्याचा योग आला. जिल्हाधिकारी हे मोठे पद असते असे तेव्हा प्रकषर्शने जाणवले लक्षात आले. आपल्याला असे काही व्हायचे असेल तर मेहनत केली पाहिजे याचीही जाणीव झाली. त्यातून हळूहळून स्पर्धा परीक्षांच्या तयारीला सुरुवात झाली. असे प्रतिपादन केंद्रिय लोकसेवा आयोगाच्या परिक्षेत यश प्राप्त केलेत्या अश्विन गोळपकर याने केले.
आपल्या यशाविषयी अश्विनने सांगितले, 2015 मध्ये दादरला लक्ष्य ऍपॅडमीमध्ये कोर्स केला. 2016 ला पहिल्या परीक्षेत यश मिळाले नाही. मग चांगल्या शैक्षणिक वातावरणसाठी 2017 मध्ये दिल्ली गाठली. दुसऱया परीक्षेत मुलाखतीपर्यंत धडक मारली. 2019 ला तिसरी परीक्षा दिली आणि अंतिम मुलाखतीत यश मिळवले. क्लास नव्हता पण टेस्ट सीरीज, प्रश्नोत्तरे, विषयानुसार गाइडन्स घेतला. खाली घेऊन एकटच राहीलो, खानावळीत जेवलो पण 10 तासांचा अभ्यास चुकला नाही. उत्तरे लिहायचा सराव केला.
या निकालानंतर आजी-आजोबा आणि आई राखी, वडील राजन यांना अत्यानंद झाला. आई-वडिलांचे स्वप्न पूर्ण झाले. अश्विनचे मूळ घर गोळप (ता. रत्नागिरी)येथील. तो म्हणाला आदर्श शिक्षक पुरस्कारप्राप्त माझे आजोबा पावस विद्यामंदिरमध्ये शिक्षक होते. लहानपणी ते इतिहासाच्या गोष्टी सांगत. त्यातून इतिहासाची आवड निर्माण झाली. आवडीमुळे वैकल्पिक विषय इतिहास घेतला. शासकिय सेवेत जाण्यास वडिलांनी प्रोस्ताहन दिले.
अश्विनचे बालवाडी ते दहावीपर्यंतचे शिक्षण परशुरामपंत अभ्यंकर विद्यामंदिर व फाटक हायस्कूमध्ये झाले. चौथी व सातवीची शिष्यवृत्ती, नॅशनल टॅलेंट सर्च परीक्षेतही त्याने यश मिळवले. ठाण्याच्या एसईएस, ज्युनियर कॉलेजमध्ये बारावी, वाशीच्या फादर ऍग्नेल कॉलेजमध्ये बीई (इलेक्ट्रिकल) आणि इंदोर आयआयएममधून एमबीए पदवी मिळवून एक वर्ष कॉर्पोरेट जॉब केला.
जिद्द सोडलेली नाही..
अश्विनचे वडील राजन गोळपकर म्हणाले या यशामुळे खूप आंनद झाला. त्याचे रॅकिंग वाढावे म्हणून तो प्रयत्न करत आहे. त्याने जिद्द सोडलेली नाही. ध्येयासाठी कठोर परिश्रम करण्याची त्याची तयारी आहे.
शाळांनी प्रोत्साहक व्हावे..
रत्नागिरीत स्पर्धा परीक्षांचे वातावरण नाही. शाळांमधून त्यासाठी विशेषत्वाने प्रयत्न होत नाही. ते वातावरण तयार करण्यासाठी शाळांमध्येच विद्यार्थ्यांना मार्गदर्शन मिळाले पाहिजे. यातून देशाची सेवा करायला मिळते व करिअर होते. रत्नागिरीकर तरुणांनी जास्तीत जास्त याकडे वळले पाहिजे असे आवाहन अश्विनने केले.









