पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दक्षता : तपासणी करूनच आत प्रवेश
प्रतिनिधी / बेळगाव
बेळगाव लोकसभा पोटनिवडणूक जाहीर झाली आहे. आता उमेदवार अर्ज भरण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयाकडे धाव घेत आहेत. त्यामुळे या परिसरात कडेकोट पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. प्रत्येकाची तपासणी करूनच आत प्रवेश देण्यात येत आहे. बेळगाव लोकसभा पोटनिवडणूक 17 एप्रिल रोजी होत आहे. त्यामुळे आता अनेक जण अर्ज दाखल करत आहेत. आतापर्यंत तिघांनी अर्ज दाखल केले. अर्ज दाखल करताना शक्तीप्रदर्शन करायचे नाही. मात्र, संबंधित उमेदवाराचे समर्थक जिल्हाधिकारी कार्यालयाच्या परिसरात उपस्थित राहण्याची शक्मयता आहे. त्यामुळे आता या परिसरात कडेकोट पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.









