ड्रेनेजची दुरुस्ती करण्याची नागरिकांची मागणी
प्रतिनिधी /बेळगाव
जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारातच डेनेजचे पाणी बऱयाचवेळा उघडय़ावर वाहत असते. त्यामुळे या ठिकाणी दुर्गंधी पसरून थांबणेदेखील कठीण झाले आहे. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या परिसरातच अशी अवस्था निर्माण झाल्याने नागरिकांतून तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.
या डेनेज चेंबरमधून काहीवेळा पाणी बाहेर येते. हा चेंबर बऱयाचवेळा ब्लॉक देखील होतो. त्यामुळे पाण्याचा निचरा योग्यप्रकारे होत नाही. परिणामी या परिसरात सर्वत्र दुर्गंधी पसरत आहे. निवेदने देण्यासाठी तसेच विविध कामांसाठी आलेल्या नागरिकांना या दुर्गंधीचा सामना करावा लागत आहे. या डेनेजच्या चेंबरला झाकण बसवावे तसेच दुरुस्ती करावी. जेणेकरून या परिसरात दुर्गंधी पसरणार नाही, याची खबरदारी घ्यावी, अशी मागणी करण्यात आली आहे.









