डॉ. के. हरिशकुमार नवे जिल्हाधिकारी
बेळगाव : लोकसभा पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी व अप्पर जिल्हाधिकाऱयांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. सोमवारी बदल्यांचे आदेश जारी झाले आहेत.
बेळगावचे जिल्हाधिकारी एम. जी. हिरेमठ यांची बदली झाली असून त्यांच्या जागेवर डॉ. के. हरिशकुमार यांची वर्णी लागली आहे. तर अप्पर जिल्हाधिकारी अशोक दुडगुंटी यांची बदली करून त्या जागेवर योगेश्वर एस. यांची नियुक्ती करण्यात आली आहे. या दोन्ही अधिकाऱयांनी सोमवारी सूत्रे स्वीकारली.
जिल्हाधिकारी हिरेमठ यांनी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दुपारी कार्यालयात पत्रकार परिषद घेतली. त्यानंतर लगेच नूतन अधिकाऱयांनी पदभार स्वीकारला. पोटनिवडणूक प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत हे दोन्ही अधिकारी बेळगावात काम करणार आहेत. या दोन्ही अधिकाऱयांना एम. जी. हिरेमठ यांनी शुभेच्छा दिल्या.