कुर्लीचा तो पोलीस अधिकारी पॉझिटीव्ह, शिराळा तालुक्यातील रिळे येथील तिघे पॉझिटीव्ह, उपचारात 58, तिघे कोरोनामुक्त
प्रतिनिधी / सांगली
शुक्रवारी जिल्हयात नवीन 12 कोरोनाबाधित आढळून आले आहेत. कोरोना रूग्णांची एकूण संख्या 143 वर पोहचली आहे. खानापूर तालुक्यातील कुर्ली येथे मुंबईहून आलेला पोलीस अधिकारीही पॉझिटीव्ह आला आहे. तर सांगली शहरातील वारणाली येथील त्या महिलेस कोरोनाची लागण झाली नाही. तीचा अहवाल निगेटीव्ह आल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. संजय साळुंखे यांनी दिली.
पॉझिटीव्ह आलेल्या सर्व रूग्णांचे कनेक्शन मुंबई
शुक्रवारी पॉझिटीव्ह आलेल्या रूग्णांमध्ये शिराळा तालुक्यातील मणदूर येथील 75 वर्षीय महिला, काळुखेवाडी येथील 40 वर्षीय महिला, कवठेमहांकाळ तालुक्यातील खरशिंग येथील 21 वर्षीय व्यक्ती, तासगाव तालुक्यातील वायफळे येथील 19 वर्षाचा युवक, मिरज तालुक्यातील मालगाव येथील 50 वर्षीय महिला, खानापूर साळसिंगे येथील 55 वर्षीय महिला, जत येथील 35 वर्षीय व्यक्ती आणि खानापूर तालुक्यातील कुर्ली येथील 35 वर्षीय व्यक्ती बाधित झाल्या आहेत. तर शिराळा तालुक्यातील रिळे येथील 70 वर्षीय, 57 वर्षीय पुरूष आणि 53 वर्षीय महिला तर शिराळा तालुक्यातीलच माळेवाडी येथील 58 वर्षीय व्यक्ती पॉझिटीव्ह आला आहे. या सर्व बाधितांचे कनेक्शन मुंबई आहे. हे सर्व मुंबईहून आपल्या मुळगावी आले आहेत.
जिल्हय़ातील तिघे कोरोनामुक्त
जिल्हय़ात शुक्रवारी उपचारानंतर तासगाव तालुक्यातील कदरेवाडी येथील 32 वर्षीय पुरूष, कडेगाव-खेराडेवांगी येथील 45 वर्षीय महिला आणि कवठेमहांकाळ तालुक्यातील नरसिंहगाव येथील 26 वर्षीय महिला कोरोनामुक्त झाले आहेत. त्यांना आता संस्था क्वारंटाईन करण्यात येणार आहे.
वारणालीच्या महिलचा कोरोना रूग्णालयात अहवाल निगेटीव्ह
सांगली शहरातील वारणाली येथील सहाव्या गल्लीत राहणाऱया 64 वर्षाच्या महिलेचा खासगी चाचणी प्रयोगशाळेत अहवाल पॉझिटीव्ह आला होता. त्यामुळे या महिलेला तातडीने मिरजेच्या कोरोना रूग्णालयात दाखल करण्यात आले होते. पण त्याठिकाणी तिचा स्वॅब घेतला असता ती महिला निगेटीव्ह आली आहे. त्यामुळे सांगली शहरातील वारणाली परिसरातील लोकांनी निःश्वास टाकला आहे. दरम्यान वैद्यकिय पथकाने तातडीने तिच्या संपर्कातील कुंटुंबांतील नऊ जणांना संस्था क्वारंटाईन केले होते. या सर्वांचे स्वॅब घेण्यात येणार असून त्यांच्या अहवालाचा निकाल आल्यानंतर त्यांना डिस्चार्ज देण्यात येणार आहे.
चौघांची प्रकृती चिंताजनक
सध्या उपचारात असलेल्या रूग्णापैकी जत तालुक्यातील आवंढी येथील 55 वर्षीय व्यक्ती, खानापूर तालुक्यातील साळशिंगे येथील 60 वर्षीय व्यक्ती, शिराळा तालुक्यातील मणदूर येथील 81 वर्षीय आणि खिरवडे येथील 56 वर्षीय व्यक्ती यांच्यावर व्हेंटीलेटरवर उपचार सुरू आहेत. यांची प्रकृती चिंताजनक आहे. तर नांगोळे येथील 48 वर्षीय व्यक्तीवर ऑक्सिजनवर उपचार सुरू आहेत. अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. संजय साळुंखे यांनी दिली.
कोरोनाची जिल्हय़ातील स्थिती
एकूण रूग्ण 143
बरे झालेले 81
उपचारात 58
मयत 04