प्रतिनिधी / ओरोस:
जिल्हय़ात शनिवारपर्यंत कोरोना बाधित 238 रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. सद्यस्थितीत जिल्हय़ात 28 रुग्णांवर उपचार सुरू असून नव्याने दाखल पाच रुग्णांचा यामध्ये समावेश आहे.
कणकवली तालुक्मयातील कासार्डे येथील संपर्कात आलेले दोन रुग्ण, मालवण तालुक्मयातील गुरामवाडी येथील संपर्कात आलेले दोन रुग्ण व सावंतवाडी येथील मुंबईहून आलेला एक रुग्ण असे नवीन पाच रुग्ण कोरोना बाधित आहेत, अशी माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. धनंजय चाकूरकर यांनी दिली.
बापार्डे-गायकवाडवाडी येथे कंटेनमेंट झोन
देवगड तालुक्मयातील बापार्डे गायकवाडवाडी येथील सदानंद कृष्णा गायकवाड यांच्या घरापुरता परिसर कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी कंटेनमेंट झोन म्हणून जाहीर करण्यात आला आहे. सदर कंटेनमेंट झोनमध्ये 29 जुलै रोजी रात्री 12 वाजेपर्यंत सर्व आस्थापना, दुकाने, वस्तू विक्री बंद राहणार आहे. तसेच या क्षेत्रामध्ये नागरिकांना येणे-जाणे व सर्व प्रकारच्या वाहनांना प्रवेश बंद असेल. हे आदेश अत्यावश्यक सेवा, सार्वजनिक वितरण व्यवस्था, वैद्यकिय उपचार व्यवस्था, बँक, सेवा देणारे अधिकारी, कर्मचारी व त्यांची वाहने यांना लागू राहणार नाही. तसेच सदर आदेशाचे उल्लंघन करणाऱयाविरुद्ध आपत्ती व्यवस्थापन कायदा 2005 कलम 51 व 58 अन्वये तसेच महाराष्ट्र पोलीस अधिनयम, 1951 चे कलम 71, 139 तसेच भारतीय दंड संहिता (45 ऑफ 1860) च्या कलम 188 अन्वये कारवाई करण्यात येईल, असे आदेश कणकवली उपविभागीय अधिकारी वैशाली राजमाने यांनी दिले आहेत.
तपासण्यात आलेले एकूण नमुने 4608
अहवाल प्राप्त झालेले नमुने 4562
आतापर्यंत पॉझिटिव्ह नमुने 272
निगेटिव्ह आलेले नमुने 4290
अहवाल प्राप्त न झालेले नमुने 46
सद्यस्थितीत जिल्हय़ातील सक्रिय रुग्ण 28
अन्य जिल्हय़ात तपासणीसाठी गेलेले रुग्ण 1
मृत्यू झालेल्या रुग्णांची संख्या 5
डिस्चार्ज देण्यात आलेले रुग्ण 238
विलगीकरण कक्षात दाखल रुग्ण 56
शनिवारी तपासणी केलेल्या व्यक्ती 4493
संस्थात्मक अलगीकरणातील व्यक्ती 13425
शासकीय संस्थांमधील अलगीकरणातील व्यक्ती 38
गाव पातळीवरील संस्थात्मक अलगीकरणातील व्यक्ती 10517
नागरी क्षेत्रातील संस्थात्मक अलगीकरणातील व्यक्ती 2870
2 मेपासून जिल्हय़ात आलेल्यांची संख्या 133802









