प्रतिनिधी / सांगली
येथील प्रियांका संग्राम सावंत यांनी जिनिव्हा युनिव्हर्सिटीच्या आंतरराष्ट्रीय लवाद व्यवस्थापन या अभ्यासक्रमात तिसऱ्या क्रमांकासह एलएलएम पदवी मिळवली आहे. या अभ्यासक्रमासाठी जगभरातून 30 विद्यार्थी स्पर्धा परीक्षेमधून निवडले जातात. प्रियांकांनी या अभ्यासक्रमात तृतीय क्रमांक मिळवून भारतीयांसाठी अभिमानास्पद यश संपादन केले आहे.
प्रियांकांनी उपरोक्त विषयामध्येच सिंगापूर लॉ स्कूलमधून एलएलबी पदवी संपादन केली होती. स्वित्झर्लंड मधील जगप्रसिद्ध लॉ लाईव्ह या विधी सल्लागार कंपनीने त्यांना व्यावसायिक सेवेसाठी निमंत्रित केले आहे.
प्रियांकांचे आजोबा, शिवाजीराव शिंदे आणि पणजोबा रामचंद्रराव शिंदे हे सांगलीचे पूर्व जिल्हाधिकारी होते. लोटस कॉम्प्युटर्स चे अशोक सावंत यांच्या त्या स्नुषा आहेत.
Previous Articleसेन्सेक्सची ऐतिहासिक कामगिरी; प्रथमच ६० हजारांवर
Next Article लसीकरणाचे प्रमाण वाढविण्यासाठी जनजागृतीवर भर द्या








