ऑनलाईन टीम / बीजिंग :
चीनचे राष्ट्रपती शी जिनपिंग यांच्याशी मिळता-जुळता चेहरा असल्याने एका प्रसिद्ध ओपेरा गायकाला टीकटॉक वापरण्यास मनाई करण्यात आली आहे.
लिउ केकिंग (वय 63) असे या प्रसिद्ध ओपेरा गायकाचे नाव असून, ते बर्लिनमध्ये राहतात. त्यांचा चेहरा राष्ट्रपती शी जिनपिंग यांच्याशी जुळतो. त्याचाच लिउ हे सोशल मीडियावर फायदा उचलत असल्याचा आरोप करत चीनने त्यांच्या सोशल मीडिया वापरास मर्यादा आणली आहे. तर टीकटॉक वापरण्यास पूर्णपणे बंदी घातली आहे.
लिउ केकिंग यांचे टीक-टॉकवर 41 हजार फॉलोअर्स आहेत.त्यांनी ओपेरा गायनाचे अनेक व्हिडीओ टीक-टॉकवर शेअर केलेले आहेत. मात्र, त्यांचे हे अकाउंट बंद करण्यात आले आहे. इमेज वॉयलेशनमुळे असे करण्यात आल्याचे त्यांना सांगण्यात आले. त्यानंतर लिउ यांनी टीक-टॉकवर दुसरे अकाउंट उघडले. मात्र, ते ही अकाउंट बंद करण्यात आले.









