जितो ऍपेक्सचे उपाध्यक्ष पारस भंडारी यांचे प्रतिपादन, नूतन कार्यकारिणीचा अधिकारग्रहण समारंभ
प्रतिनिधी / बेळगाव
जितो ही संस्था केवळ व्यापारच नव्हे तर मानवतेसाठी काम करते. त्यामुळेच शिक्षण, आरोग्य, क्रीडा क्षेत्रातील गरजूंना संस्था मदत करते. जितो बेळगावने आपला वेगळा आदर्श निर्माण करत गरीब विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी आर्थिक मदत करणे, पूरग्रस्तांना मदत, वसतिगृह बांधणे, महिलांना आत्मनिर्भर करण्यासाठी प्रयत्न केला आहे. यामुळेच जितोचे कार्य कौतुकास्पद आहे, असे विचार जितो ऍपेक्सचे उपाध्यक्ष पारस भंडारी यांनी मांडले.
जितो बेळगावच्या नूतन कार्यकारिणीचा अधिकारग्रहण समारंभ नुकताच पार पडला. यावेळी ते बोलत होते. नूतन कार्यकारिणीच्या अध्यक्षपदी उद्योजक सुनील कटारिया व जनरल सेपेटरी अंकित खोडा यांना अधिकार बहाल करण्यात आले. विजय पाटील यांना उत्तम कार्य केल्याबद्दल जितो रत्न पुरस्काराने गौरविण्यात आले.
यावेळी ओमप्रकाश जैन, प्रवीण बाफना, अभिजित शहा, शिल मिर्जी, उपाध्यक्ष पुष्पक हणमण्णावर व मुकेश पोरवाल, कार्यदर्शी अमित दोशी, अभिजित भोजण्णावर, खजिनदार महेंद्र परमार, सहखजिनदार अभिजित मिर्जी, विजय पाटील, नितीन चिवटे आदी उपस्थित होते.









