प्रतिनिधी /बेळगाव
जितो बेळगाव लेडीज विंगच्या नूतन पदाधिकाऱयांचा पदग्रहण कार्यक्रम नुकताच आयएमईआरच्या सभागृहात पार पडला. यावेळी अध्यक्षा अरुणा शहा यांनी स्वागत केले. प्रमुख पाहुण्या म्हणून जितो लेडीज विंगच्या व्हा. चेअरमन ललिता गुलेचा उपस्थित होत्या. कार्यवाह शिल्पा हजारे यांनी त्यांच्या कार्यकाळात केलेल्या विविध प्रकल्पांची माहिती दिली.
यानंतर नूतन अध्यक्षा रुपाली जनाज आणि कार्यवाह रुमा पाटील यांचा परिचय अनुक्रमे कीर्ती दोड्डण्णावर व रुपाली जनाज यांनी करून दिला. ललिता गुलेचा यांच्या हस्ते नूतन अध्यक्ष व कार्यकारी मंडळाला पदभार सोपवून कार्यष्ठेचीची शपथ देण्यात आली. नूतन कार्यवाह रुमा पाटील यांनी भविष्यातील विविध उपक्रमांची माहिती दिली. ग्रामीण भागातील स्त्रियांना व्यासपीठ उपलब्ध करून देण्यासाठी विशेष प्रयत्न करू, असे यावेळी सांगितले.
प्रकल्पाअंतर्गत भरतेश एज्युकेशन ट्रस्टने दत्तक घेतलेल्या अनाथ मुलांसाठी 10 हजार रुपयांची देणगी दिली. केकेजी झोनच्या समन्वयिका भारती हरदी व ललिता गुलेचा यांनी नूतन पदाधिकाऱयांना व सभासदांना मार्गदर्शन केले. जितो मेन विंगचे अध्यक्ष पुष्पक हणमण्णावर यांनी लेडीज विंगच्या कामाचे कौतुक करून नव्या कमिटीला सर्वतोपरी मदतीचे आश्वासन दिले. रुमा पाटील यांनी आभार मानले.









