मुंबई / ऑनलाईन टीम
राज्यात कोरोना रूग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. अशा स्थितीत राज्यात राज्यात सात ते आठ दिवस पुरेल एवढाच रक्तसाठा शिल्लक राहिला आहे. या पार्श्वभूमीवर गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी तरुण-तरुणींना रक्तदान करण्याचे आवाहन सोशल मीडियाच्या माध्यमातून केले आहे.
जितेंद्र आव्हाड यांनी ट्विट करत म्हटले आहे की, राज्यात केवळ सात-आठ दिवस पुरेल इतका रक्तसाठा उरला आहे. आज कोरोनाला न घाबरता, सोशल डिस्टसिंग पाळून खासकरुन तरुण-तरुणींनी बाहेर पडून रक्तदान करावे. कुणाचे तरी प्राण वाचविण्यासाठी आपलं रक्त उपयुक्त ठरेल, ही भावना मनात ठेवून रक्तदान करा.
यासोबतच कोरोना रूग्णांची वाढती संख्या लक्षात घेता मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी आज उच्चस्तरीय बैठक बोलावली आहे. या बैठकीत राज्याच्या कोरोना परिस्थितीचा आढावा घेण्यात येणार आहे.