प्रतिनिधी / सांगली
जगतगुरु तुकोबाराय साहित्य परिषदेच्या प्रदेशाध्यक्ष डॉ. निर्मला पाटील यांची मराठा सेवा संघ प्रणित जिजाऊ ब्रिगेड च्या “राष्ट्रीय अध्यक्ष” पदी निवड करण्यात आली. मराठा सेवा संघाचे संस्थापक पुरुषोत्तम खेडेकर यांच्या मार्गदर्शनाखाली मराठा सेवा संघाचे राष्ट्रीय अध्यक्ष कामाजी पवार आणि महाराष्ट्र प्रदेश महासचिव मधुकर मेहेकरे यांनी ही निवड केली.
डॉ. निर्मला यांनी यापूर्वी जिजाऊ ब्रिगेडच्या सांगली जिल्हाध्यक्ष, विभागीय अध्यक्ष म्हणूनही काम पहिले आहे. तसेच त्यांचा सामाजिक चळवळींमध्येही सक्रिय सहभाग असतो, शिवधर्म सोहळ्याचे त्या पौरोहित्य करतात तसेच महिलांच्या समस्यांवर काम करतात.
जिजाऊ ब्रिगेड प्रामुख्याने महिलांना संघटित करणे, राजमाता जिजाऊंच्या प्रेरणेतून त्यांना स्त्रीशक्तीची जाणीव करून देणे, प्रत्येक घरातील स्त्री हीच खरी दिशादर्शक असते त्यामुळे त्यांना शिक्षण आणि स्वावलंबनाचे महत्व पटवून देऊन आत्मनिर्भर बनवणे, अनिष्ठ रूढी आणि परंपरांतून त्यांची मुक्तता करणे, महिलांच्या प्रश्नांना वाचा फोडून त्यांना न्याय मिळवून देणे या सर्व महिलाविषयक गोष्टींवर काम करते.
Previous Articleबेळगाव जिल्हय़ात शुक्रवारी 420 जणांना कोरोनाची लागण
Next Article सांगली जिल्ह्यात 9 जणांचा मृत्यू, 225 रूग्ण वाढले








