प्रतिनिधी / उस्मानाबाद
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या इतिहासातील बऱ्याच चांगल्या गोष्टी समोर आल्या नाहीत चालु असलेले अन्याय, अत्याचार पाहून माँ साहेब जिजाऊ ने स्वराज्य स्थापण्यासाठी आर्थिक बचत केली. आणि या आर्थिक बचतीतुनच छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याची स्थापना केली, असे प्रतिपादन राष्ट्रवादी काँग्रेसचे डॉ. प्रतापसिंह पाटील यांनी केले.
जिजामाता उद्यान चौकात मध्यवर्ती सार्वजनिक शिवजयंती महोत्सव समितीच्या वतीने शिवमुर्ती पुजनाचा कार्यक्रम घेण्यात आला. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणुन प्रतापसिंह पाटील बोलत होते. यावेळी प्रमुख उपस्थिती म्हणुन मसूद शेख, सय्यद खलिल, प्रल्हाद मुंडे, ज्येष्ठ पत्रकार राजाभाऊ वैद्य, नादेरउल्ला हुसेनी,विक्रम पाटील, अमरसिंह देशमुख आदींची उपस्थिती होती. पुढे बोलताना डॉ. प्रतापसिंह पाटील यांनी ग्रामीण भागातील लोकांनी जिजाऊंचा हा आर्थिक बचतीचा गुण घेणे आवश्यक आहे. सध्या ग्रामीण भागात नेहमीच अर्थकारणामुळे लोक अडचणीत येतात. त्यासाठी बचतीची सवय लावणे आवश्यक आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याचे ध्येय गाठण्यासाठी सर्व प्रकारची गंभीर मानसिकता तयार केली. महाराजांचा हा आदर्श घेण्यासारखा आहे, ४०० वर्षानंतर सुध्दा त्यांच्या विचारांची गरज आपल्याला आज ही भासते, असे त्यांनी सांगितले.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव









