नवी दिल्ली
ऑक्टोबर-डिसेंबरच्या कालावधीत तिसऱया तिमाहीत जिंदाल स्टेनलेस स्टील (जेएसएल) कंपनीचा एकत्रित निव्वळ नफा 170.20 कोटी रुपयांवर पोहचला आहे. कंपनीच्या उत्पन्नातदेखील सदरच्या कालावधीत वाढ झाली आहे. कंपनीचा मागच्या वर्षीचा समान कालावधीतला निव्वळ नफा 51.68 कोटी रुपये इतका होता. एकूण उत्पन्न 3,592.04 कोटी रुपयांवर पोहचले आहे. मागच्या वर्षी ते 3,312.44 कोटी रुपये इतके होते. तर कंपनीचा खर्च सदरच्या तिमाहीत 3,332.99 कोटी रुपये इतका झाला आहे जो मागच्या वर्षी समान कालावधीत 3,255.34 कोटी रुपये इतका होता.









