नवी दिल्ली
खासगी क्षेत्रातील कंपनी जिंदाल स्टील अँड पॉवर लिमिटेडने डिसेंबरमध्ये उत्पादनात 30 टक्के वाढ केली आहे. तसेच विक्रीतही 25 टक्के वाढ दर्शवली आहे. कंपनीचे एकूण पोलाद उत्पादन 7.27 लाख टन इतके डिसेंबरमध्ये नोंदले गेले आहे. मागच्या वर्षी याच महिन्यात उत्पादन 5.59 लाख टन इतके होते. त्याचप्रमाणे पोलादाची विक्री डिसेंबरमध्ये 7.11 लाख टन इतकी झाली आहे. मागच्या वर्षी 2019 मध्ये विक्री 5.67 लाख टन इतकी होती. ऑक्टोबर ते डिसेंबरच्या कालावधीत उत्पादन 19.26 लाख टन इतके होते. मागच्या वर्षाच्या समान कालावधीतील तुलनेत विक्रीचे प्रमाण 20 टक्के अधिक होते.









