मुंबई
पोलाद उत्पादन क्षेत्रातली मोठी कंपनी जेएसडब्ल्यू ग्रुपने चीनमधून कच्चा माल आयात न करण्याचा निर्णय नुकताच घेतला आहे. जिंदाल कंपनी दरवर्षी चीनमधून चारशे दशलक्ष डॉलर्सच्या वस्तु आयात करतो. ही आयात पुढच्या दोन वर्षांमध्ये शून्यावर आणण्याचा निर्णय जिंदाल ग्रुपने नुकताच घेतला आहे. चिनी उत्पादनांवर बहिष्कार घालण्याच्या सरकारच्या आवाहनानुसार जिंदालने हा निर्णय घेतल्याचे सांगण्यात येत आहे. चीनमधून 400 दशलक्ष डॉलर्सची खरेदी पुढील काळात थांबवली जाणार असून त्याबाबतची उपाययोजना आखली जात असल्याचे कंपनीच्या सूत्रांनी सांगितले.









