वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
भारतीय जाहिरात क्षेत्राचे उत्पन्न वर्ष 2024 पर्यंत जवळपास एक लाख कोटी रुपयांच्या घरात पोहोचणार असल्याची माहिती उद्योग मंडळ फिक्की व कंपनी ईवाई यांच्या अहवालामधून देण्यात आली आहे. तसेच या क्षेत्राचा वाढीचा दर हा 12 टक्क्यांहून अधिक राहणार असल्याचेही यावेळी सांगितले आहे.
भारतीय माध्यम आणि मनोरंजन क्षेत्राचे उत्पन्न हे वर्ष 2021 मध्ये 16.4 टक्क्यांनी वधारुन 1.61 लाख कोटींवर पोहोचले आहे. यासह वर्ष 2022 मध्ये माध्यम व मनोरंजन क्षेत्रात 17 टक्क्यांची वाढ होत 1.89 लाख कोटी रुपयांच्या घरात उत्पन्न पोहोचणार आहे. महामारी पूर्व 2019 चा टप्पाही प्राप्त करणार असून 2024 पर्यंत या स्थितीत आणखीन सुधारणा होणार असल्याचा अंदाजही यावेळी नोंदवला आहे.









