ऑनलाईन टीम / जालना :
बहुप्रतिक्षित नांदेड ते हडपसर (पुणे) व जालना ते ओरिसा या जालना जिल्ह्यातील पहिल्या किसान रेल्वेला आजपासून प्रारंभ झाला. केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी हिरवा झेंडा दाखवून या सेवेची सुरुवात केली.
प्रशस्त रेल्वे कोच, अंतर्गत सीसीटीव्ही सुविधायुक्त असलेल्या या रेल्वेची पहिली फेरी आज जालना येथून सुरू झाली. जालना जिल्ह्यातील कांदा उत्पादक बळीराजा ऍग्रो प्रोडय़ूसर कंपनीचा 350 टन कांदा आज जालना येथून आसामला रवाना झाला. 2800 किमीचा प्रवास करुन हे कांदे जोरहाट येथे पोहचतील. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आत्मनिर्भर भारत या मिशनच्या दिशेने टाकलेले हे आणखी एक प्रगतीचे पाऊल आहे, असे ट्विट रावसाहेब दानवे यांनी याप्रसंगी केले.
या किसान रेल्वेमुळे आता जालना जिल्ह्यातील मोसंबी, मिरची, लिंबू व भाजीपाला उत्पादक शेतकऱ्यांना बाहेरील राज्यात आपला शेतीमाल नेणे सोयीचे झाले आहे.









