प्रतिनिधी /बेळगाव
जायंट्स सखीतर्फे जायंट्स सप्ताहानिमित्त महिला आणि मुलींसाठी घेण्यात आलेल्या ऑनलाईन नृत्य, वेशभूषा, केश रचना व वक्तृत्व स्पर्धांचा बक्षीस वितरण कार्यक्रम जायंट्स भवन येथे नुकताच पार पडला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नीता पाटील तर प्रमुख पाहुण्या म्हणून राजश्री रंगोळी उपस्थित होत्या. व्यासपीठावर फेडरेशन संचालिका ज्योती अनगोळकर, माजी अध्यक्षा नम्रता महागावकर, उपाध्यक्षा चंद्रा चोपडे होत्या. कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वनाने झाली.
जायंट्सची प्रार्थना झाल्यानंतर अर्चना पाटील, ज्योती पवार व ज्योती सांगूकर यांनी स्वागतगीत म्हटले. स्वागत आणि प्रास्ताविक करताना उपाध्यक्षा विद्या सरनोबत यांनी सखीचा मुख्य उद्देश, गेल्या तीन चार वर्षांत केलेल्या कार्याचा आढावा घेतला.
त्यानंतर उपस्थित मान्यवरांना गुलाबपुष्प आणि भेटवस्तू देऊन सन्मानित करण्यात आले. यानंतर ज्योती अनगोळकर यांनी जायंट्स सप्ताह का साजरा केला जातो तसेच कशा पद्धतीने आपण या ऑनलाईन स्पर्धा भरवतो याबद्दल माहिती सांगितली. अध्यक्षीय भाषणात निता पाटील यांनी विजेत्यांचे कौतुक करून त्यांचे अभिनंदन केले. यानंतर प्रमुख पाहुण्या राजश्री रंगोळी, मनीषा कारेकर, मनीषा देवकर, अश्विनी हंगीरगेकर व पदाधिकाऱयांच्या हस्ते ऑनलाईन स्पर्धेतील विजेत्या स्पर्धकांना स्मृतिचिन्ह आणि भेटवस्तू देण्यात आल्या.
स्पर्धांसाठी परीक्षक म्हणून तेजस्विनी सोमसाळे, मनीषा देवकर, संगीता लोहार यांचे सहकार्य लाभले त्यांचा भेटवस्तू देऊन सन्मान करण्यात आला. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी लता कंग्राळकर, अनुपमा कोकणे, सुलोचना कुटे, शितल नेसरीकर, सुलक्षणा शिन्नोळकर यांनी परिश्रम घेतले. या कार्यक्रमास सविता मोरे, राजश्री हसबे, अर्पणा पाटील, सुवर्णा काळे, भाग्यश्री पवारसहित विद्यार्थी आणि पालकवर्ग उपस्थित होता. सूत्रसंचालन सचिव शितल पाटील यांनी केले. चंद्रा चोपडे यांनी आभार मानले.









