प्रतिनिधी /बेळगाव
जायंट्स सखीच्यावतीने डॉक्टर्स डे चे औचित्य साधून गुरुवार दि. 1 रोजी डॉ. केतकी पावसकर यांचा सन्मान करण्यात येणार आहे. दुपारी 1 वाजता मराठा मंदिरनजीकच्या इंद्रप्रस्थनगर येथील यशोदा हॉस्पिटलमध्ये हा कार्यक्रम होणार आहे. दरवषी जायंट्स सखीच्यावतीने महिला डॉक्टरांचा सन्मान करण्यात येतो. डॉ. पावसकर या एम. बी. बी. एस. पदवीधर असून, मागील 35 वर्षांपासून सेवा बजावत आहेत. कोरोना काळात इतर रुग्णांनाही बंद असतानाही त्यांनी मात्र एक दिवस देखील हॉस्पिटल बंद न करता रुग्णांची सेवा केली आहे.









