प्रतिनिधी/ बेळगाव
गेल्यावषी कोरोनाकाळात अनेकांना मदतीचा हात पुढे करणाऱया जायंट्स सखी या महिलांच्या संस्थेने यावषीसुद्धा आपण समाजाचे काही तरी देणे लागतो, या उद्देशाने महाराष्ट्र एकीकरण समितीच्या कोविड आयसोलेशन सेंटरला 40 हजारांची मदत केली आहे.
गेल्यावषी अनेक गरीब महिलांना रेशन किटचे वितरण, भाजीपाला वितरण, सॅनिटायझर, मास्क, आश्रमामधील मुलांना सॅनिटरी नॅपकिन, रोगप्रतिकारक औषधे यांचे वाटप करून सामाजिक बांधिलकी जपली होती.
यावषी पुन्हा कोरोनाची दुसरी लाट आली असून यावेळी कोविड रुग्णांना बेड, ऑक्सिजन मिळत नाही. ही मोठी समस्या लक्षात घेऊन समितीने सुरू केलेल्या विलगीकरण केंद्राची जायंट्स सखीच्या पदाधिकाऱयांनी प्रशंसा करून आर्थिक सहकार्य केले आहे.
यावेळी अध्यक्षा नीता पाटील, फेडरेशन संचालिका ज्योती अनगोळकर, उपाध्यक्षा चंद्रा चोपडे, विद्या सरनोबत, लता कंग्राळकर, शीतल नेसरीकर, अर्चना पाटील, सुलक्षणा शिनोळकर उपस्थित होत्या.









