प्रतिनिधी / बेळगाव
जायंट्स मेनतर्फे गुरुवारी डॉक्टर्स डे चे औचित्य साधून सहा डॉक्टरांचा यथोचित सत्कार करण्यात आला. महात्मा फुले रोड येथील तुकाराम बँकेच्या सभागृहात हा कार्यक्रम झाला. व्यासपीठावर प्रमुख पाहुणे म्हणून विमा फार्माचे हर्षवर्धन इंचल, अध्यक्ष संजय पाटील, सचिव विजय बनसूर, मोहन कारेकर, शिवकुमार हिरेमठ आदी उपस्थित होते.
प्रारंभी मदन बामणे स्वागत व प्रास्ताविक करताना म्हणाले, जायंट्स मेनतर्फे समाजात निःस्वार्थपणे आरोग्यसेवा पुरविणाऱया डॉक्टरांचा दरवषी गौरव केला असल्याचे सांगितले. यावेळी डॉ. प्रकाश राजगोळकर, डॉ. संजय आढाव, डॉ. मधुसुदन मुरकुटे, डॉ. शैलेंद्र मुतगेकर, डॉ. वामन चोपडे, डॉ. झिशान अली जमादार यांचा जायंट्स मेनच्या पदाधिकारी व सदस्यांच्या उपस्थितीत सन्मानचिन्ह, शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सन्मान केला.
यावेळी सत्काराला उत्तर देताना सत्कारमूर्ती डॉक्टरांनी कृतज्ञता व्यक्त केली. यावेळी हर्षवर्धन इंचल म्हणाले, कोरोनासारख्या कठीण काळात आपला जीव धोक्मयात घालून रुग्णांना आरोग्याची सेवा पुरविणाऱया डॉक्टरांचे कार्य कौतुकास्पद आहे. भीतीच्या वातावरणात आपल्या जीवापेक्षा रुग्णसेवा हीच ईश्वरसेवा मानून अनेक गोरगरिबांची सेवा केली. अशा डॉक्टरांचे कार्य मोठे असल्याचे त्यांनी सांगितले.
याप्रसंगी मदन बामणे, सुनील मुतगेकर, अशोक हलगेकर, लक्ष्मण शिंदे, आर. आय. पाटील, सुनील मुरकुटे, अविनाश पाटील, अनंत लाड, विश्वास पवार, सुनील चौगुले, अनिल चौगुले, पांडुरंग पालेकर यांसह डॉक्टरांचे कुटुंबीय व जायंट्स मेनचे पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते.









