बेळगाव : जायंट्स मेनतर्फे डॉक्टर्स डे निमित्त काही डॉक्टरांचा सत्कार करण्यात येणार आहे. गुरुवार दि. 1 रोजी दुपारी 4.30 वाजता तुकाराम बँकेच्या अर्जुनराव दळवी सभागृहात हा कार्यक्रम होणार आहे. यावेळी सहा डॉक्टरांचा सत्कार करण्यात येणार असून त्यांचा परिचय..
डॉ. प्रकाश राजगोळकर

डॉ. प्रकाश राजगोळकर हे बीएचएमएस असून ते समर्थनगर येथे आपली सेवा बजावत आहेत. गेल्या दहा वर्षांपासून डेंग्यू चिकुनगुनियावर बेळगाव तालुक्मयातील खेडय़ांमध्ये मोफत आरोग्य शिबिरे आयोजिले आहेत. कोविड रुग्णांवर उपचार करत असताना त्यांना व त्यांच्या कुटुंबीयांना मानसिक आधार देण्याचे काम डॉ. राजगोळकर यांनी केले आहे.
डॉ. संजय आढाव

डॉ. संजय आढाव हे बीएचएमएस असून त्यांनी अनेक मेडिकल कॅम्पस आयोजित केले असून कोविड काळात त्यांनी रुग्णांना सेवा दिली आहे.
डॉ. मधुसूधन मुरकुटे

डॉ. मधुसूधन मुरकुटे हे बीडीएस असून ते दंतवैद्य म्हणून काम करतात. इंडियन डेंटल असोसिएशनचे अध्यक्ष असताना अनेक डेंटल मेडिकल कॅम्प आयोजित केली होती.
डॉ. शैलेंद्र मुतगेकर

डॉ. शैलेंद्र मुतगेकर हे लाईफ केअर हॉस्पिटलचे संचालक असून त्यांनी मुंबई, गोवा आणि बेळगाव या ठिकाणी आपली सेवा बजावली आहे. गरीब व गरजूंसाठी त्यांनी विशेष कार्य केले आहे. त्यांनी अनेक रुग्णांवर यशस्वी शस्त्रक्रिया केल्या असून गेल्या वषीपासून आजतागयत दहा हजारांहून अधिक कोविड रुग्णांवर उपचार केले आहेत.
डॉ. वामन चोपडे

डॉ. वामन चोपडे हे बीएचएमएस असून गेल्या पंचवीस वर्षांपासून उचगावसारख्या ग्रामीण भागात गोरगरिबांना आपली सेवा देत आहेत. कोविड रुग्णांसाठी ते चोवीस तास उपलब्ध आहेत.
डॉ. झिशान जमादार

डॉ. झिशान जमादार हे डेक्कन हॉस्पिटलमध्ये आपली सेवा देत असून कोविड रुग्णांचे देवदूत म्हणून त्यांनी कार्य केले आहे. अगदी तरुण वयात रात्रंदिवस कोविड रुग्णांची सेवा केल्याने ते रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांचे अगदी आवडते डॉक्टर म्हणून प्रसिद्ध झाले.









