प्रतिनिधी / बेळगाव
जायंट्स ग्रुप ऑफ बेळगाव मेनच्या अध्यक्षपदी संजय पाटील यांची नियुक्ती झाली. त्यांच्यासह इतर पदाधिकाऱयांचा अधिकारग्रहण समारंभ शुक्रवारी गॅलॅक्सी हॉल टिळकवाडी येथे पार पडला. प्रमुख पाहुणे म्हणून उद्योजक सतीश तेंडोलकर व बांधकाम व्यावसायिक विजय पाटील उपस्थित होते. व्यासपीठावर जायंट्सचे मोहन कारेकर, अनंत जांगळे, मदन बामणे यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते. यावेळी प्रमुख पाहुण्यांनी मार्गदर्शन केले.









