मुंबई/प्रतिनिधी
मुख्यमंत्र्यांच्या विरोधात आक्षेपार्ह विधान केल्याप्रकरणी नाशिक येथे दाखल झालेल्या तक्रारीनुसार केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना पोलिसांनी मंगळवारी संगमेश्वर येथे अटक केली. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबद्दल वादग्रस्त आणि समाजात तेढ पसरवणारे विधान केल्याच्या आरोपावरूनराणे यांना महाडमधील कोर्टात हजर करण्यात आलं असता जामीन मंजूर करण्यात आला. प्रथमवर्ग दंडाधिकाऱ्यांनी रात्री उशिरा जामीन मंजूर केला. जामीन मिळाल्यानंतर रात्री नारायण राणे यांनी ट्वीट केलं आहे
प्रथमवर्ग दंडाधिकाऱ्यांनी रात्री उशिरा जामीन मंजूर केला. जामीन मिळाल्यानंतर रात्री नारायण राणे यांनी ट्वीट करत ‘सत्यमेव जयते’ असं म्हटलं आहे.








