नवी दिल्ली
भारतीय रिझर्व्ह बँकेने (आरबीआय)कार्ड पेमेन्टचे नवीन नियम सादर केले आहेत. सदरचे नवीन नियम 1 जानेवारी 2022 पासून लागू होणार असल्याचे संकेत आहेत. ऑनलाईन पेमेन्टसाठी आता टोकन सिस्टम सुरु होणार आहे. कार्डच्या मदतीने व्यवहारात कार्ड सादर करणारी बँक किंवा कार्ड नेटवर्कसह अन्य वास्तविक कार्डचा डाटा स्टोअर करता येणार नाही.
व्यवहार ट्रकिंग किंवा वाद निर्माण होऊ नये म्हणून पेमेन्ट ऍग्रीमेन्टसह डाटा स्टोअर करता येणार आहे. वास्तविक कार्ड नंबर आणि कार्ड वापरणाऱयाचे नावाचे अंतिम चार अंकांपर्यंत स्टोअर करण्यास सवलत मिळणार आहे.
काय आहे ‘कार्ड टोकन’ सिस्टम?
1 जानेवारी 2022 पासून ग्राहकांना आपले कार्ड डिटेल्स कोणत्याही तिसऱया पार्टी ऍपसोबत शेअर करता येणार नाही. आता असे होणार नाही, की ग्राहकाने ऑनलाईन जेवण मागविले किंवा कॅब बुक केली तर ग्राहकांना डिटेल माहिती द्यावी लागते आणि आपल्या कार्डची संपूर्ण माहिती सेव्ह केली जाते. यामुळे माहिती चोरण्याचा धोका अधिक असल्याची माहिती आहे. परंतु नव्या सुविधेमुळे ग्राहकांना कोणत्याही शॉपिंगवेळी पेमेन्ट करताना आपल्या 16 अंकी कार्डचा नंबर न देता त्याच्या जागी टोकन नंबर टाईप करावा लागणार असल्याची माहिती आहे.









