सूरज नांबियारसोबत करणार विवाह
अभिनेत्री मौनी रॉय दुबईतील व्यावसायिक सूरज नांबियारसोबत रिलेशनशिपमध्ये असून त्याच्यासोबत विवाह करणार आहे. मौनी जानेवारीमध्ये सूरजसोबत विवाहाच्या बंधनात अडकणार असल्याचे वृत्त आहे. अभिनेत्रीचा नातलग विद्युत रॉयसरकरने विवाहाच्या वृत्ताची पुष्टी दिली आहे.

विवाह सोहळा दुबई किंवा इटलीत होणार आहे, कारण दोघेही हा सोहळा हा खासगी स्वरुपाचा राखू इच्छितात. मित्र आणि कुटुंबीयांसाठी एक सोहळा मौनीचे मूळ गाव कूचबिहारमध्ये आयोजित करण्याचा विचार सुरू आहे. मौनी आणि सूरज 2019 पासून परस्परांना डेट करत आहेत.
मौनी रॉय लवकरच अयान मुखर्जीचा चित्रपट ‘ब्रह्मास्त्र’मध्ये रणबीर कपूर आणि आलिया भट्टसोबत दिसून येणार आहे. या चित्रपटात अमिताभ बच्चन आणि नागार्जुन देखील महत्त्वाच्या भूमिकेत दिसून येणार आहेत. मौनी काही दिवसांपूर्वी एका म्युझिक व्हिडिओत गायक जुबिन नौटियालसोबत झळकली होती.









