सुदैवाने कोणालाही इजा नाही
प्रतिनिधी/ बेळगाव
कारने ऑटोरिक्षाला ठोकरल्याने रिक्षा उलटली. शनिवारी सकाळी जाधवनगर परिसरात ही घटना घडली असून केवळ सुदैवाने या अपघातात कोणालाही इजा पोहोचली नाही.
सकाळी 10 वाजता ही घटना घडली असून यासंबंधी रात्री वाहतूक उत्तर विभाग पोलिसांशी संपर्क साधला असता एफआयआर दाखल झाला नसल्याचे पोलिसांनी सांगितले. अपघातानंतर घटनास्थळी गर्दी जमली होती.









