प्रतिनिधी/ बेळगाव
शिवसेना बेळगाव जिल्हा सीमाभागाच्यावतीने रामलिंगखिंड गल्ली येथील कार्यालयात श्रीराम मंदिराच्या पुनर्बांधकामाचे भूमिपूजन केल्याबद्दल आनंदोत्सव करण्यात आला. यानिमित्त 11 किलो लाडुंचे परिसरात वाटप करण्यात आले. श्रीराम मंदिरासाठीचे शिवसेनेचे योगदान न विसरण्यासारखे आहे. त्यामुळे शिवसेनेच्यावतीने सर्वत्र आनंदोत्सव साजरा करण्यात येत आहे. या कार्यक्रमप्रसंगी संपर्क प्रमुख अरविंद नागनुरी, जिल्हाप्रमुख प्रकाश शिरोळकर, उपजिल्हा प्रमुख बंडू केरवाडकर, तालुका प्रमुख सचिन गोरले, माजी महापौर आप्पासाहेब पुजारी, प्रवीण तेजम, मल्लाप्पा परीट, विठ्ठल तेजम, मयुरेश काकतकर, राहुल भोसले, श्रेयस तेरगावकर यासह शिवसैनिक उपस्थित होते









