चिपळूण
दोन दिवसांपूर्वी सोशल मिडियावर गोहत्येसंदर्भात आक्षेपार्ह लिखाण करुन जातीय तेढ निर्माण करणाऱयांविरोधात पोलिसांनी कडक कारवाई करावी, अशा मागणीचे निवेदन येथील मनसे पदाधिकाऱयांनी पोलिसांना दिले आहे.
या निवेदनात म्हटले की, सोशल मिडियावर व्हायरल करण्यात आलेली ही पोस्ट गोकुळ ग्राम चिपळूण या गोशाळेची आहे. यात गोहत्या केल्याचे आक्षेपार्ह लिखाण करण्यात आले आहे. या पोस्टमुळे दोन समाजामध्ये जातीयवाद भडकवण्याचा प्रयत्न केला जात असून यासंदर्भात पोलिसांनी सखोल चौकशी करावी. तसेच दोषींना अटक करुन त्यांच्यावर कारवाई करावी. हे निवेदन पोलीस उपनिरीक्षक संदीप पाटील यांनी स्वीकारले.
यावेळी मनसे तालुकाध्यक्ष संतोष नलावडे, शहराध्यक्ष मुबीन गोठे, उपतालुकाध्यक्ष नाना चाळके, अमोल अवेरे, परेश साळवी, शब्बीर सय्यद, जईम मोडक, वृषाली सावंत आदी उपस्थित होते.









