मुंबई \ ऑनलाईन टीम
जातीनिहाय जनगणना करण्यासाठी बिहारमधील सत्ताधारी पक्ष एकवटले आहेत. बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी १० सदस्यीय शिष्टमंडळासह दिल्लीत जाऊन नुकतीच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेटी घेतली. या पक्षांनी एकत्रित येत या भेटीत जातीनिहाय जनगणनेची मागणी पंतप्रधान मोदींकडे केली. यानंचर राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनीही असंच चित्रं महाराष्ट्रात दिसलं असतं तर बरं झालं असतं, अशी भावना व्यक्त केली आहे.
रोहित पवार यांनी ट्विट करून ही भावना व्यक्त केली आहे. जातीनिहाय जनगणनेच्या आकडेवारीसाठी बिहारमधील सत्ताधारी आणि विरोधी पक्षाने राजकीय मतभेद बाजूला सारत पंतप्रधानांची एकत्रित भेट घेतली. असंच चित्र आपल्या राज्यातही दिसलं असतं तर बरं वाटलं असतं. पण हरकत नाही याबाबत राज्यातील महाविकास आघाडी सरकार योग्य दिशेने प्रयत्न करत आहे, असो रोहित पवार यांनी म्हटलं आहे.
केंद्र सरकारने इम्पिरिकल डेटा उपलब्ध करून दिला तर आरक्षणाचा विषय मार्गी लागण्यास मोठी मदत होईल. राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी तसंच देशातील इतर राज्यांनीही हीच मागणी केलीय. त्यामुळं केंद्र सरकार यात निश्चित लक्ष घालेल, ही अपेक्षा आहे, असंही त्यांनी पंतप्रधानांना टॅग करून म्हटलं आहे.