पाचवे सत्रही नुकसानीसोबत बंद : सेन्सेक्स 344 अंकांनी गडगडला
मुंबई
चालू सप्ताहातील बुधवारी तिसऱ्या सत्रात बीएसई सेन्सेक्स व एनएसई निफ्टी यांचे निर्देशांक सलग पाचव्या सत्रात घसरुन बंद झाले आहेत. यामध्ये जागतिक पातळीवरील मिळत्याजुळत्या संकेतामध्ये भारतीय बाजार प्रभावीत होत बंद झाला आहे. भारतीय बाजार हा सलग पाचव्या सत्रात दिवसभरातील कामगिरीनंतर 344 अंकांनी घसरुन बंद झाला आहे. यावेळी निफ्टी 17 हजाराच्या खाली राहिला आहे.
बुधवारी बाजारात रिलायन्स इंडस्ट्रीज, भारती एअरटेल, टाटा मोर्ट्स, महिंद्रा अॅण्ड महिंद्रा यांचे समभाग हे नुकसानीत राहिले असून यावेळी अदानीचे समभाग हे सलग चौथ्या सत्रात घसरण थांबविण्यात यशस्वी ठरले आहेत. बुधवारी सकाळच्या सत्रात जागतिक संकेत सकारात्मक मिळाल्याने भारतीय बाजारात मोठा उत्साह राहिला होता. परंतु तब्बल 440 अंकांचा सेन्सेक्सने उच्चांक प्राप्त केल्यानंतर अंतिमक्षणी ही तेजी कायम ठेवण्यात बाजाराला अपयश आले आहे.
दिग्गज कंपन्यांच्या मदतीने बीएसई सेन्सेक्स दिवसअखेर 344.29 अंकांनी प्रभावीत होत निर्देशांक 0.59 टक्क्यांसोबत 57,555.90 वर बंद झाला आहे. दुसऱ्या बाजूला राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी हा 71.15 अंकांच्या नुकसानीसह निर्देशांक 16,972.15 वर बंद झाला आहे. प्रमुख कंपन्यांमध्ये सेन्सेक्समधील 30 मधील 21 समभाग हे प्रभावीत होत बंद झाले आहेत. यासोबतच सर्वाधिक घसरणीत रिलायन्स इंडस्ट्रीजचे, इंडसइंड बँकेचे समभाग राहिले आहेत. यामध्ये इंडसइंड बँकेचे समभाग हे 1.92 टक्क्यांनी नुकसानीत राहिले. यासोबतच भारती एअरटेल, हिंदुस्थान युनिलिव्हर, अॅक्सिस बँक, स्टेट बँक, एचडीएफसी, टाटा मोर्ट्स, महिंद्रा अॅण्ड महिंद्रासह अन्य कंपन्यांचे समभाग मोठ्या फरकाने आपटले आहेत. एशियन पेंट्सचे समभाग 3 टक्के तेजीसह बंद झाले. अदानी एंटरप्रायजेस, टाटा स्टील व टायटन यांचे समभाग हे मजबूत राहिले आहेत. यासोबतच लार्सन अॅण्ड टुब्रो, कोटक महिंद्रा, अल्ट्राटेक सिमेंट यांचे समभाग वधारत बंद झाले.









