सेन्सेक्स 157 तर निफ्टी 47 अंकांनी वधारले
वृत्तसंस्था /मुंबई
जागतिक बाजारातील सकारात्मक संकेतामुळे भारतीय भांडवली बाजार तेजी कायम ठेवत बंद झाला आहे. यामध्ये मुख्य कंपन्यांपैकी रिलायन्स इंडस्ट्रीज, आयटीसी आणि लार्सन ऍण्ड टुब्रो यांचे समभाग वधारल्याची नोंद करण्यात आली आहे.
प्रमुख कंपन्यांच्या मदतीने दिवसअखेर सेन्सेक्स 157.45 अंकांनी वधारुन निर्देशांक 58,807.13 वर बंद झाला आहे. दुसऱया बाजूला राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी 47.10 अंकांच्या तेजीसह निर्देशांक 17,516.85 वर बंद झाल्याचे दिसून आले.
दिग्गज कंपन्यांच्या कामगिरीसोबत मुख्य कंपन्यांमध्ये आयटीसीचा समभाग पाच टक्क्यांनी वधारुन सर्वाधिक तेजीत राहिला आहे. यासोबतच अन्य कंपन्यांमध्ये लार्सन ऍण्ड टुब्रो, एशियन पेन्ट्स, रिलायन्स इंडस्ट्रीज, महिंद्रा ऍण्ड महिंद्रा, बजाज फायनान्स आणि इन्फोसिस यांचे समभाग मजबूत राहिले आहेत. दुसऱया बाजूला एचडीएफसी बँक, टायटन, नेस्ले इंडिया, एनटीपीसी आणि पॉवरग्रिड कॉर्प यांचे समभाग घसरणीत राहिले आहेत.
आशियातील अन्य बाजारात चीनचा शांघाय कम्पोझिटचा निर्देशांक, दक्षिण कोरियाचा कोस्पी आणि हाँगकाँगचा हँगसेंग हे लाभात राहिले आहेत. तर जपानचा निक्की मात्र घसरणीत राहिला होता. याचदरम्यान आंतरराष्ट्रीय बाजारात कच्चे तेल 0.63 टक्क्यांनी घसरल्याचे दिसले आहे.
चालू आठवडय़ातील चौथ्या सत्रात गुरुवारी शेअर बाजारात प्रारंभीच्या कालावधीत नफावसुली झाल्यामुळे बाजारात नुकसानीचे सत्र राहिले होते. परंतु त्यानंतर मात्र जागतिक बाजारातील सकारात्मक वातावरणाने शेअर बाजाराला मजबुती दिली. गमावलेली तेजी परत मिळत भारतीय बाजार सावरला असल्याचे पहावयास मिळाले आहे. विविध टप्प्यावरील वातावरणात प्रामुख्याने गुंतवणूकदारांना अमेरिकेतील महागाई दराच्या आकडय़ाची प्रतीक्षा आहे.
समभाग वधारलेल्या कंपन्या
- आयटीसी……. 235
- लार्सन ऍण्ड टुब्रो 1879
- एशियन पेन्ट्स 3178
- रिलायन्स इंडस्ट्रीज 2455
- महिंद्रा ऍण्ड महिंद्रा 851
- बजाज फायनान्स 7439
- डॉ.रेड्डीज लॅब 4600
- इन्फोसिस…. 1762
- टेक महिंद्रा.. 1611
- टाटा स्टील… 1176
- आयसीआयसीआय 755
- बजाज ऑटो. 3339
- सनफार्मा……. 759
- अल्ट्राटेक सिमेंट 7428
- इंडसइंड बँक. 946
- सिमेन्स…….. 2272
- ब्रिटानिया….. 3628
- हिरोमोटो कॉर्प 2523
- एसीसी…….. 2320
- अशोक लेलँड 127
- डाबर इंडिया.. 579
समभाग घसरलेल्या कंपन्या
- एचडीएफसी 1527
- टायटन…….. 2373
- नेस्ले……… 19283
- एनटीपीसी….. 126
- पॉवरग्रिड कॉर्प 203
- टीसीएस…… 3603
- स्टेट बँक……. 488
- कोटक महिंद्रा 1911
- ऍक्सिस बँक… 694
- एचडीएफसी 2841
- एचसीएल टेक 1168
- मारुती सुझुकी 7419
- बजाज फिनसर्व्ह 17585
- भारती एअरटेल 713
- हिंदुस्थान युनि 2340
- बायोकॉन……. 372
- हॅवेल्स इंडिया 1390
- कोलगेट…… 1444
- एसबीआय लाईफ 1160
- सिप्ला……….. 894
- टाटा पॉवर 227









