8 मार्चला जागतिक महिला दिनाचे आयोजन केले जाते. यानिमित्ताने विविध क्षेत्रातील महिलांच्या योगदानाबाबत त्यांचे कौतुक केले जाते. 21 व्या शतकात महिलेने प्रत्येक क्षेत्रात प्रगती साधली आहे. आर्थिक, शैक्षणिक, तांत्रिक, सामाजिक अशी अनेक क्षेत्रे प्रगतीसह सर केली आहेत. तिच्यासाठी हा अभिमानाचाच दिवस.

समाजातील तळागाळातील होतकरू महिलांना व्यावसायिक प्रशिक्षण देण्यात महिला आघाडीने आघाडी घेतली आहे. आर्थिक, सामाजिक, राजकीय, सांस्कृतिक आणि शैक्षणिक सबलीकरणाच्या कार्यामध्ये महिला आघाडीने योगदान दिले आहे. शिवणक्लास, मेहेंदी काढणे, ब्युटी पार्लर, रांगोळी, इलेक्ट्रिक माळा तयार करणे, तिळगुळाचे तसेच मोत्याचे दागिने बनविणे, चॉकलेट तयार करणे, कुकींग क्लासेस, लोणची, पापड, चटण्यांची निर्मिती करणे अशा विविध व्यवसायांचे प्रशिक्षण तळागाळातील महिलांना दिले जाते. या आधारे या महिला स्वावलंबी होवून आर्थिक दृष्टय़ा सक्षम होतात. याखेरीज महिलांसाठी आरोग्य तपासणी शिबिरेही आघाडीतर्फे मोफत राबविण्यात आली आहेत. मतदान ओळखपत्र करून देणे, यादीत नाव समाविष्ट करणे, विधवा वेतन, वृद्धाप वेतन अशी कामेही करून दिली आहेत. गणेशोत्सवात विविध साहित्याचा बाजारही भरवला जातो. दिवाळी, नागपंचमीला फराळही ना नफा तत्वावर विक्री केला जातो.
रेणू किल्लेकर

महिलांची प्रत्येक क्षेत्रातली कामगिरी आज उंचवणारी ठरली आहे. कोरोनाच्या काळामध्ये रुग्णांची सेवा करण्यामध्ये 70 ते 80 टक्के महिलांनी योगदान दिले होते. आपत्ती व्यवस्थापनाच्या कार्यामध्येही महिला अधिक चांगले योगदान देताना दिसतात. राष्ट्रीय पातळीवरही योग्य प्रशिक्षणाच्या आधारे महिला यश मिळवू लागल्या आहेत. निर्णय क्षमताही त्यांची चांगली असून वैयक्तिक पातळीवर अर्थिक दृष्टय़ा सक्षमही त्या होवू लागल्या आहेत. स्थानिक महिलांना संघटना आणि सहकाराच्या माध्यमातून अधिकाधिक प्रोत्साहनही मिळायला हवे.
प्रिती पाटील

आंतरराष्ट्रीय महिला दिन हा महिलांचा सन्मान करण्याचा दिवस. विविध क्षेत्रामध्ये दिलेल्या योगदानाचे कौतुक करण्याचा हा महिलांकरीताचा महत्त्वाचा दिवस. 2022 वर्ष हे स्त्री-पुरुष समानता या थिमअंतर्गत साजरे केले जात आहे. 8 मार्चचा दिवस प्रत्येक महिलेकरीता प्रेरणादायी असाच ठरतो आहे. सर्व महिलांसाठी हा अभिमानाचा दिवस आहे. सामाजिक, अर्थिक आणि राजकीय स्तरावर महिला अभिमानाने आपली कामगिरी उत्तमपणे पार पाडत आहेत. आपली कामगिरी नित्य उंचावत गरुडभरारी घेण्याच्या दिशेने महिला कार्यरत आहेत.
प्रतिभा दडकर, चेअरपर्सन, श्री महिला को. ऑप. सोसायटी

महिला दिन हा महिलांकरीता खास दिन म्हणायला हवा. आजच्या महिलांनी जीवनात यशस्वी होण्यासाठी प्रयत्न करायला हवा. त्याकरीता जास्तीतजास्त कष्टही घ्यायला हवेत. इतरांसाठी आपण आदर्श ठरावे अशा प्रकारचे कार्य आजच्या महिलांनी करण्याची गरज आहे.
तृप्ती देसाई, वृषाली कलेक्शन
आम्ही उत्तम दर्जाची बेकरी उत्पादने बेळगाव जिल्हय़ात वितरीत करतो. उत्पादने हायजीनसह वेळेवर दुकानदारांना पुरवठा केला जातो. गेली 32 वर्षे बेकरी व्यवसायात आम्ही कार्यरत आहोत. आजचं वातावरण हे महिलांसाठी खूप चांगलं आहे. कर्ज मिळण्याच्या सहज सुलभतेमुळे अनेक विविध उद्योगाच्या संधी आजमावण्याची संधी महिलांना लाभते आहे. महिलांनी धाडसाने स्वावलंबी होत उद्योग उभारला पाहिजे आणि यायोगे विकास साधला पाहिजे.

ज्योत्स्ना पै, पै बेकरी
आंतरराष्ट्रीय महिला दिवस दरवर्षी 8 मार्चला साजरा केला जातो. महिलांच्या सन्मानार्थ या दिवशी विशेष कार्यक्रमाचे आयोजन केले जाते. “Gender equality for a sustainable tomorrow’’ ही महिला दिनाची थीम आहे. पण समाजात पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून चालणारी स्त्री आजही लिंग भेदामुळे बऱयाचदा समान संधींपासून वंचित राहते. Break The Bias म्हणत हाच लिंगभेद मोडण्यासाठी यंदा महिला दिन साजरा होणार आहे. पूर्वग्रह मोडून काढत आपण सगळ्यांनीच यशाची नवीन शिखरं सर करावीत हीच शुभेच्छा.

आसावरी संत
स्त्रियांमध्ये जन्मजात धीरोदात्तपणा व शिस्त हे गुण असतात.अडचणींतून मार्ग काढण्याचे कौशल्य असते. कुटुंबाच्या आर्थिक निर्णयात पत्नीने सक्रिय सहभाग घेतल्यास कुटुंबाला अर्थ निर्भर होण्यास त्याचा नक्कीच फायदा होतो हे मी माझ्या 20 वर्षाच्या गुंतवणूक सल्लागार पदाच्या अनुभवातून सांगू शकते.

-अनिता दत्ता कणबर्गी
निसर्ग संवर्धनासाठी स्त्रियांचे योगदान
यंदाच्या म्हणजेच 8 मार्च 2022 च्या महिला दिनाची थीम अतिशय वेगळी आहे, ती म्हणजे ‘भविष्याच्या शाश्वत विकासासाठी लिंगसमानता-आजची गरज’. 21 व्या शतकात मानव समाजाने जीवनातल्या प्रत्येक क्षेत्रात प्रगती साधली आहे. आर्थिक, शैक्षणिक, तांत्रिक, सामाजिक अशी अनेक क्षेत्रे प्रगतीच्या प्रभावाखाली आली आहेत. सामाजिक क्षेत्रातील सगळय़ात मोठी प्रगती म्हणजे लिंग समानतेसाठी झालेले प्रयत्न आणि त्यात बऱयापैकी मिळविलेले यश. लिंग समानतेसाठी राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर जोरदार प्रयत्न केले गेले आणि अजुनही सुरू आहेत.
आज आपण आधुनिकतेकडे वाटचाल करीत आहोत आणि आधुनिकतेच्या आहारी जाताना बऱयाच प्रमाणात निसर्गाचे नुकसानही करीत आहोत. त्याचाच परिणाम म्हणून आज अवकाळी पाऊस, पावसाचे कमी-जास्त प्रमाण, जागतिक तापमान वाढ यासारख्या अनेक गंभीर नैसर्गिक समस्यांना तोंड देत आहोत. विकासकामे जलद गतीने होत आहेत आणि त्यामुळे निसर्गाची इतक्मया मोठय़ा प्रमाणात हानी होत आहे की पुढच्या पिढीला हा निसर्ग अनुभवता येईल का? असा प्रश्न भेडसवायला लागला आहे आणि त्याचमुळे ‘शाश्वत विकास ध्येयाबद्दलची’ जागरूकता निर्माण झाली. या निसर्गाच्या बचावासाठी झटणाऱयांमध्ये अनेक स्त्रियांचाही सहभाग आहे. प्राचीन काळापासून स्त्राr आणि निसर्ग यांचा मेळ आहे. स्त्राr सतत निसर्गाच्या सानिध्यात आणि संपर्कात वावरत आली आहे. हिंदी कवयित्री डॉ. विदुषी शर्मा यांच्या ‘नारी’या कवितेतील दोन काव्य पंक्ती इथे आठवतात.
सृष्टी का आधार है नारी, प्रकृती का शृंगार है नारी,
नारी है तो प्रेम है, बंधन है, हर रिश्ते की डोर है नारी।
या काव्य पंक्ती स्त्राr आणि निसर्ग यांच्यातील नात्याचे वर्णन करण्यास समर्पक आहेत. आपल्या भारतात अशा अनेक स्त्रिया आहेत ज्यांनी कोणत्याही मदतीशिवाय निसर्ग संवर्धनाचे काम केले आहे आणि करत आहे. या सगळय़ाजणी सुशिक्षित, तरुण किंवा आधुनिक आहेत असे नाही तर 13 ते 14 वर्षापासून 70-80 वर्षापर्यंतच्या आदिवासी, ग्रामीण महिलाही आहेत.
कर्नाटकातील होन्नोळी सारख्या एका छोटय़ा खेडय़ातील तुळसी गौड महिलेचे नाव इथे आवर्जून नमूद करावेसे वाटते. या स्त्राrने घटत चाललेल्या रानावनांच्या काळजीने जवळ जवळ 40 हजार रोपांची लागवड करून त्यांचे वृक्षात रूपांतर होईस्तोवर स्वतःच्या मुलांसारखी काळजी घेतली आणि वन संवर्धनाद्वारे निसर्ग जपण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला, तो ही कोणतीही अपेक्षा न बाळगता 72 वर्षांपर्यंत अविरत श्रम घेतले. तिच्या या कामाची दखल भारत सरकारद्वारे 26 जानेवारी 2020 ला घेतली गेली आणि त्यांना पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
तुळसी गौड सारखीच आणखीन एक खेडूत महिला जिला ‘सीड मदर’ म्हणून संबोधले जाते. ती म्हणजे राहीबाई पोपरे. त्यांचा उल्लेखही इथे गरजेचा आहे. महाराष्ट्रातील एका छोटय़ाशा खेडय़ातील या सामान्य स्त्राrने आपले गाव व शेती सोडून दुसरे काहीच पाहिले नाही. लहानपणापासून शेती काम करून सर्व पिकांची व्यवस्थित माहिती घेतली आणि आपले संपूर्ण आयुष्य बीज संवर्धनासाठी समर्पित केले. एकदा त्यांचा नातू आजारी पडला, त्यामागचे कारण त्यांना हायब्रिड बियाणे आणि आधुनिक पद्धतीने घेतलेली पिके आहेत यावर ठाम विश्वास होता. याच कारणामुळे त्यांनी आपल्या मुलाला अशी बियाणे आपल्या शेतात न वापरण्याची समज दिली. पुढे त्यांनी स्थानिक बियाणांच्या संवर्धनाचे काम हाती घेतले. त्यांनी 43 एकर जमिनीवर जवळजवळ 17 वेगवेगळय़ा प्रकारची पिके घेण्याचा विक्रम केला आणि यासाठी कोणत्याही आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केला गेला नाही. त्यांनी स्वतःची अशी एक बियाणांची बँक आपल्या राहत्या घरी सुरू केली.
राहीबाईंनी बीज संवर्धनाचे तंत्र आपल्यापुरते न ठेवता त्यांनी ते इतर शेतकरी वर्गालाही दिले. त्यांनी स्वतः जमिनीची सुपिकता टिकविण्याचा आणि कीटनाशक बनविण्याच्या देशी पद्धतीचा शोध लावून यांचाही प्रचार केला व नव्या शेतकऱयांचे एक प्रेरणास्थान बनल्या. त्यांच्या या अतिशय वेगळय़ा कामाची दखल घेत भारत सरकारने त्यांना 2018 साली ‘नारी शक्ती पुरस्कार’ व 2020 साली पद्मश्री पुरस्कार देऊन त्यांचा गौरव केला. म्हणूनच या वषीची महिला दिनाची थीम ही तुळशी गौड आणि राहीबाईसारख्या ‘निसर्ग रक्षक’ आणि ‘निसर्ग संवर्धक’ स्त्रियांसाठी सादर समर्पित आहे.
– डॉ. शर्मिला भि. संभाजी, समाजशास्त्र विभाग, आरपीडी महाविद्यालय, बेळगाव









