ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :
कोरोनामुळे आर्थिक अडचणीत आलेल्या उद्योगांना उभारी देण्यासाठी जागतिक बँकेने भारताला 1 अब्ज डॉलरचे सामाजिक सुरक्षा पॅकेज जाहीर केले आहे. जागतिक बँकेचे भारतातील संचालक जुनैद अहमद यांनी याबाबतची माहिती दिली असून, एका वृत्तसंस्थेने याबाबतचे ट्विट केले आहे.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर करण्यात आलेल्या देशव्यापी लॉकडाऊनमुळे उद्योगधंदे अडचणीत आले आहेत. महसूल जमा न झाल्याने सरकारवरही आर्थिक संकटात सापडले आहे. त्यामुळे देशातील आरोग्य व्यवस्था, सामाजिक सुरक्षा, लघु आणि मध्यम उद्योगांना सावरण्यासाठी जागतिक बँकेने भारताला 1 अब्ज डॉलरचे सामाजिक सुरक्षा पॅकेज जाहीर केले आहे.










