आंतरराष्ट्रीय कामगार संघटनेच्या अहवालात माहिती : उत्पन्न 10.7 टक्के घटले
वृत्तसंस्था / संयुक्त राष्ट्र
कोरोना महामारीच्या प्रवासाचा परिणाम कोणत्याही एका देशावर न होता त्याचा प्रभाव हा जगातील सर्वाधिक किंवा सर्वच देशांवर राहिल्याचे मागील काही दिवसांपासून पहावयास मिळत आहे. याचाच एक भाग म्हणून 2020 मधील पहिल्या तीन तिमाहीमध्ये जागतिक पातळीवरील कामगारांच्या उत्पन्नात जवळपास 10.7 टक्क्यांची घट नोंदवत 3,500 अब्ज डॉलरची घसरण राहिली असल्याची माहिती आंतरराष्ट्रीय कामगार संघटनेच्या (आयएलओ) अहवालातून दिली आहे.
महामारीच्या संकट काळात जगभरातील परिस्थितीची माहिती घेत आपला अहवाल सादर केला आहे. कोरोनामुळे अनेक कारखाने सध्या बंद आहेत. कोविड19 च्या कारणामुळे कामात घट होत मोठय़ा प्रमाणात नुकसानीचा भार सहन करावा लागल्याची माहिती आहे. यामध्ये जगभरातील कामगारांचे उत्पन्न मोठय़ा प्रमाणात घसरत गेल्याचे दिसून आले आहे.
यामध्ये आयएलओने म्हटले आहे, की सर्वाधिक फटका हा लहान आणि मध्यम उत्पन्न वर्गातील देशांना बसला आहे. जिथे कामगारांचे उत्पन्नातील नुकसान हे 15.1 टक्क्मयांवर पोहोचले आहे.
तासागणिक नुकसान
कोविड19 आणि कामगारांची जगातील सहाव्या संस्कारणात असे म्हटले आहे की, 2020 च्या अगोदर 9 महिन्यातील कार्यात तासावर आधारीत नुकसान राहिल्याची नोंद केली आहे. तसेच संशोधकांच्या माहितीनुसार चालू वर्षातील दुसऱया तिमाहीत 2019 मधील चौथ्या तिमाहीच्या आधारे जागतिक पातळीवरील तासागणिक नुकसानीचे प्रमाण हे जवळपास 17.03 टक्क्मयावर राहिले आहे. 2020 च्या तिसऱया तिमाहीत तासांच्या आधारे होणाऱया नुकसानीचा आकडा हा विक्रमी असून तो 12.1 टक्क्मयांवर आला आहे.