सत्यवती कॉलनीतील घटना
प्रतिनिधी / वारणानगर
सत्यवती कॉलनी,जाखले ता. पन्हाळा येथे रविवार दि.१४ रोजी रात्री उशीरा पती- पत्नीच्या कौटोबिंक वादातून पत्नीने रागाच्या भरात डोक्यात लोखंडी हातोडा मारून पतीचा खून केला. संजय तुकाराम घेवदे वय ५२ असे मृतचे नाव आहे. मुलगा रोहित सजय घेवदे याने आईच्या विरूद्ध कोडोली पोलीस ठाण्यात फिर्याद नोंदवली आहे.
सत्यवती कॉलनीत रहाणारे संजय तुकाराम घेवदे हे वारणा साखर कारखान्याचे कर्मचारी आहेत संजय व पत्नी संगीता यांच्यात कौटोबिक वाद सुरू झाल्यावर या उभयतात धक्का बुक्की देखील झाली यामध्ये संजय हे खाली पडल्यावर पत्नी संगीता हिने डोक्यात लोखंडी हातोडा मारल्यावर त्यातच पती संजय याचा जागीच मृत्यू झाला.
या घटनेची फिर्याद नोंदवल्यावर घटनास्थळी कोडोली पोलीस ठाण्याचे सहा. पोलीस निरीक्षक सूरज बनसोडे, फौजदार नरेद्र पाटील यानी घटनास्थळी भेट देवून पंचनामा करून तपासाला सुरवात केली आहे.