चिपळूण
तालुक्यातील ताम्हणमाळा-पाथरवाडी येथून 65 हजार रूपये किंमतीचा जांभा दगड चोरी प्रकरणी पोलिसांनी तिघांना यापूर्वीच अटक केली आहे. त्यानंतर शनिवारी या चोरीप्रकरणी 2000 जांभ्यासह जेसीबी व डंपर जप्त केला आहे.
याप्रकरणी प्रशांत उर्फ बाप्पा सुरेश निवळकर (कात्रोळी-कुंभारवाडी), सोपान सुदाम पवार (घोणसरे), सचिन बाबू राठोड (कात्रोळी-कुंभारवाडी) यांना अटक करण्यात आली आहे. याप्रकरणी सुनील भाऊराव जाधव (तुरंबव-वाडदेवाडी) यांनी फिर्याद दिली आहे. 15 ते 27 जून या कालावधीत ताम्हणमाळा-पाथरवाडी येथून 65 हजार किंमतीचा जांभा दगड जेसीबी व डंपरच्या सहाय्याने चोरुन नेल्याची घटना घडली होती.
याप्रकरणी या तिघांना अटक केली आहे. तसेच हा जांभा दगड चोरुन नेण्यासाठी वापरण्यात आलेला जेसीबी, डंपर तसेच चोरलेला 2000 जांभा दगड पोलिसांनी शनिवारी जप्त केला आहे. अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक समेद बेग करीत आहेत.









