मृतदेह काढण्यात पोलिसांनाही यश
प्रतिनिधी/शिरोळ
जांभळी (ता. शिरोळ) येथील विवाहित महिलेने आपल्या दोन मुलींसह विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केली. या घटनेने संपूर्ण गावात हळहळ व्यक्त केली जात आहे. घटनास्थळी शिरोळ पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक शिवानंद कुंभार पोलीस निरीक्षक नवनाथ सुळ यांच्यासह अन्य पोलीस व रेकयु फोर्स जवान व गावकर्यांनी शोध घेत आई व दोन्ही मुलीचा मृतदेह बाहेर काढला. यानंतर पोलिसांनी ही आत्महत्या की घातपात त्यादृष्टीने तपास सुरू केला आहे.
जांभळी येथील सौ. सुप्रिया शिवाजी भोसले (वय-24) हिने जांभळी येथील पिराच्या मळ्याजवळ असलेल्या विहिरीत मुलगी मृणाली (5) व मृण्मयी (4) या दोघींना घेऊन उडी मारून आत्महत्या केली. आत्महत्येचे कारण समजू शकले नाही काल सोमवारी रात्री तिने आत्महत्या केली असावी असा पोलिसांचा अंदाज आहे. घटनास्थळी जयसिंगपूर विभागाचे डीवायएसपी रामेश्वर वैजने यांनी भेट देऊन पाहणी करून पुढील तपासाच्या सूचना दिल्या.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव









