वार्ताहर/कणकुंबी
जांबोटी येथील श्री मंजुनाथ मठाचे प्रमुख अरुण महाराज कणगुटकर यांच्या मार्फत जांबोटी येथील रामापूरपेठ, बसस्टँड आणि राजवाडा येथे संपूर्ण गावात सॅनिटायझरची फवारणी करण्यात आली. जांबोटी ग्रामपंचायत, पोलीस प्रशासन आणि अरूण महाराज कणगुटकर यांच्या नेतृत्वाखाली जांबोटी गावात सर्वत्र सॅनिटायझरची फवारणी करण्यात आली.
गेल्या काही दिवसापासून जांबोटी, कणकुंबी भागात कोरोना रूग्ण सापडत असून, जांबोटीसह अनेक गावात कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या वाढत आहे. त्यासाठी खबरदारीची उपाययोजना म्हणून अरुण महाराज कणगुटकर यांनी स्व खर्चातून संपूर्ण गावात, घराघरात सॅनिटायझरची फवारणी केली. यावेळी जांबोटी ग्रामपंचायत अध्यक्ष महेश गुरव तसेच पंचायत सदस्य संजय मुतगी, सूर्यकांत साबळे, मारुती सुतार व पंचायतीचे सर्व सदस्य, पीडीओ उदयकुमार शिवापुरे, सेपेटरी नारायण पाटील, सर्व कर्मचारी, जांबोटी आऊट पोस्टचे हवालदार बसवनेप्पा कोणीन्रवर, पोलीस कर्मचारी अदृश्य चिक्केरी तसेच जांबोटी येथील श्री मंजुनाथ मठाचे प्रमुख अरुण महाराज कणगुटकर आणि त्यांच्या भक्तगणांच्या उपस्थितीत सॅनिटायझरची फवारणी करण्यात आली.
यापूर्वीही अरुण महाराज कणगुटकर यांनी वेळोवेळी वेगवेगळे सामाजिक उपक्रम राबविलेले आहेत. गेल्या वषी महाप्रलय काळात नुकसानग्रस्त नागरिकांना जांबोटी कणकुंबी भागासह तालुक्मयाच्या इतर भागात तसेच चंदगड भागात जीवनोपयोगी साहित्य व औषधे वितरण केली होती. गेल्या वषी कोरोना काळात अरुण महाराजांनी जांबोटी येथे सॅनिटायझरची फवारणी केली होती.यावषीही अरुण महाराज कणगुटकरनी स्वखर्चाने हा उपक्रम राबविल्याने त्यांचे जांबोटी ग्रामपंचायत, पोलीस प्रशासन व नागरिकांतून अभिनंदन करण्यात येत आहे.
जांबोटी-कणकुंबी भागात बहुसंख्य लोक आजारी
गेल्या दीड-दोन महिन्यांपासून जांबोटी, कणकुंबी भागातील प्रत्येक गावात 60 ते 70 टक्के लोक आजारी असून ताप, सर्दी, खोकला, अंगदुखी अशा विविध व्याधीनी त्रस्त आहेत. वास्तविक ही सर्व कोरोना रोगाची लक्षणे असून या भागामध्ये आरोग्य खात्याची कोणतीही सुविध उपलब्ध नसल्याने येथील रुग्णांना खासगी डॉक्टरकडून उपचार करून घेणे भाग पडत आहे. काही स्थानिक डॉक्टरांच्यामते जांबोटी, कणकुंबी भागात कोरोनाचे रुग्ण आहेत. अशा परिस्थितीत प्रत्येक गावांमध्ये रुग्णांची संख्या वाढत असून घरच्या घरीच उपचार घेतले जात आहेत. काही गावामध्ये कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण असल्याचा अंदाज व्यक्त केला जात असून भीतीपोटी कोणीही बोलायला तयार नाहीत.
अनेकांच्या बळीमुळे चिंता
कणकुंबी भागात एक दोन रुग्ण गमावल्याची घटना घडली आहे. कणकुंबी वनखात्यातील एका कर्मचाऱयाचा कोरोनामुळे मृत्यू झाला असून अद्यापही काही जण उपचार घेत असल्याचे वृत्त आहे. या भागातील इतर गावांमध्ये सुध्दा कोरोनाचे अनेक रुग्ण आहेत. परंतु सरकारी दवाखान्यातून तपासून न घेता हे सर्व किरकोळ आजारच आहेच असे समजून सर्व रुग्ण खासगी डॉक्टरकडे उपचार घेत आहेत. वास्तविक या सर्वांची तपासणी केली तर हे सर्व रुग्ण पॉझिटिव्ह येण्याची शक्मयता आहे. सरकारी आरोग्य खात्याकडून या रुग्णांच्यासाठी कोणत्याही प्रकारची सोयीसुविध करण्यात आलेली नाही. त्यामुळेच नागरिकांना स्वतावर अवलंबून रहावे लागत आहे.








