आरोग्य विभागाच्या अधिकाऱयांची कारवाई
प्रतिनिधी / बेळगाव
जांबेगाळी (ता. खानापूर) येथील एका क्लिनीकवर आरोग्य विभागाने छापा टाकला. कोणत्याही प्रकारची वैद्यकीय पदवी न घेता दवाखाना चालविणाऱया गृहस्थावर कारवाई करण्यात आली आहे. गुरुवारी ही कारवाई करण्यात आली. जिल्हा आरोग्य व कुटुंब कल्याण अधिकारी डॉ. एस. व्ही. मुन्याळ, केपीएमई नोडल अधिकारी डॉ. एम. व्ही. किवडसण्णावर, जिल्हा आयुष अधिकारी श्रीकांत सुनधोळी, खानापूर तालुका आरोग्याधिकारी डॉ. एस. आर. नांदे, मंजुनाथ बिसनळ्ळी आदींचा समावेश असलेल्या पथकाने कारवाई केली. रफीक हलसीकर या बोगस
डॉक्टरावर कारवाई करून नोटीस जारी केली असून त्याने थाटलेल्या दवाखान्याला टाळे ठोकले आहेत. अधिकाऱयांनी छापा टाकला त्यावेळी वैद्यकीय कचऱयाचा खच पडला होता.









