जळगाव : ऑनलाईन टीम
जळगाव महापौर निवडीकडे सर्वांचे लक्ष लागले होते. शिवसेनेकडून भाजपचा पराभव झाला आहे. बहमुत असतानाही भाजपला पराभवाचा सामना करावा लागला आहे. शिवसेनेच्या जयश्री महाजन यांची जळगाव महापौरपदी निवड झाली आहे. जयश्री महाजन यांना 45 मते पडली आहेत.
भाजपचे 27 नगरसेवक फुटल्याने भाजपला हा धक्का बसला आहे. सार्वजनिक बांधकाम मंत्री व शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांची खेळी यशस्वी ठरली आहे. या विजयानंतर जळगावमध्ये शिवसेनेच्या कार्यकत्यांमध्ये जल्लोषाचे वातावरण आहे.








