चन्नम्मा चौकातील गणेश मंदिरापासून प्रारंभ – किल्ला दुर्गामाता मंदिरात दौडची सांगता
प्रतिनिधी/ बेळगाव
व्यसनाधीनतेकडे वळलेल्या तरुणाईला धर्माविषयी माहिती व्हावी, या उद्देशाने भिडे गुरुजींनी शिवप्रतिष्ठानच्या माध्यमातून दुर्गामाता दौड सुरू केली. मागील अनेक वर्षांपासून बेळगावमध्येही भक्तीपूर्ण वातावरणात दौड काढली जात आहे. नवरात्रीच्या तिसऱया दिवशी जल्लोशपूर्ण वातावरणात निवडक धारकऱयांच्या उपस्थितीत दुर्गामाता दौड काढण्यात आली.
तिसऱया दिवशीच्या दौडची सुरुवात चन्नम्मा चौकातील गणेश मंदिर येथून झाली. कॅम्प पोलीस स्थानकाचे निरीक्षक प्रभाकर धर्मट्टी यांच्या हस्ते ध्वज चढविण्यात आला. हुबळी-धारवाड टाऊन प्लॅनिंग कार्यालयाचे सहसंचालक विवेक कारेकर यांच्या हस्ते आरती करण्यात आली. चन्नम्मा चौक येथून दौडला प्रारंभ होऊन आरटीओ सर्कलमार्गे किल्ला येथील दुर्गामाता मंदिरात दौडची सांगता झाली.
किल्ला येथील बटालियनच्यावतीने पारंपरिक पद्धतीने दौडचे स्वागत करण्यात आले. सुभेदार बाबू पाटील, नगरसेवक शिवाजी मंडोळकर, मल्लेश बडमंजी, प्रदीप अष्टेकर, परशराम मुरकुटे, सुनील हलगेकर यांनी दुर्गामाता दौडचे स्वागत केले. दुर्गादेवीचे पूजन व आरती करून दौडची सांगता करण्यात आली. दौडच्या मार्गावरील आकर्षक रांगोळय़ा व फुलांची सजावट लक्षवेधी ठरली.
सोमवारच्या दौडचा मार्ग
सोमवार दि. 11 रोजी बसवाण्णा मंदिर नेहरुनगर येथून दौडला प्रारंभ होणार आहे. नेहरुनगर दुसरा क्रॉस, रामदेव हॉटेल, दुर्गामाता चौक, शिवबसवनगर, जोतिबा मंदिर येथे दौडची सांगता होणार आहे.
छोटय़ा सर्वमसाठी शिवप्रति÷ानची मदतीची हाक
लक्ष्मी रोड, शहापूर येथील सर्वम बाळेकुंद्री या दोन वर्षाच्या बालकाला दुर्मीळ असा स्पायनल मस्क्मयुलर एट्रोपी हा आजार झाला आहे. त्याला या आजारातून बरे होण्यासाठी 16 कोटी रुपये किमतीच्या इंजेक्शनची आवश्यकता आहे. या इंजेक्शनसाठी बेळगावमधील सामाजिक संस्था, दानशूर व्यक्तींनी पुढे येऊन आपल्याला शक्मय होईल तितकी रक्कम सर्वमच्या उपचारासाठी द्यावी, असे आवाहन जिल्हाप्रमुख किरण गावडे यांनी केले आहे.









