माजी मंत्री आर. व्ही. देशपांडे यांच्या दूरदृष्टिकोनातून हल्याळ-दांडेली-जोयडा येथील जनतेला मिळाला लाभ
प्रतिनिधी / हल्याळ
आजच्या शतकातील सर्वात मोठी समस्या पाणी आहे. हवामान बदलामुळे पृथ्वीवरचा समतोल बिघडला आहे. कधी दुष्काळ, कधी अतिवृष्टी, गारवा तर कुठे अधिक तापमान यातच शेतकऱयांचे हाल होताना दिसत आहेत. आपल्या संस्कृतीत म्हणूनच पाण्याला जीवन म्हणतात. कवी देखील म्हणून गेले आहेत. ’जल न होता तो जग जाता जल’ ही एक प्रस्तावनाच होती. एका चांगल्या प्रकल्पाची, ज्यानी दुष्काळ पीडित बळीराजाच्या तोंडावर हसू आणलं. माजी मंत्री आणि आमदार आर. व्ही. देशपांडे लोक कल्याणाचा विचार करतात. त्यातून निर्माण झाला जल संजीवन प्रकल्प. संजीवनी माणसाला प्राण देते आणि आजच्या काळात पाणीच प्राण ठरला आहे. म्हणूनच या प्रकल्पाचं नाव जलसंजीवन हे सार्थ आहे.
सलग तीन वर्षे दुष्काळामुळे आर. व्ही. देशपांडेंच्या मतदार संघातील हल्याळ, दांडेली, जोयडा तालुक्मयातील जनता व शेतकरी हवालदिल होते. देशपांडे यांनी जेव्हा मतदार संघाची सुक्ष्म पाहणी केली, तेव्हा त्यांच्या लक्षात आले की तिन्ही तालुक्मयात तलाव आहेत. पण ते गाळाने भरलेले आहेत. त्यावर विचारविनिमय करण्यासाठी त्यांनी तात्काळ सभा घेतल्या. सभेत सारे तलाव आणि तळी पुनर्जीवित करण्याचे ठरविण्यात आले.
113 तलाव पुनर्जीवित
गाळ, कचरा, चिखल साऱयाचा निचरा करण्याचे सर्वांच्या संमतीने ठरले. देशपांडे साहेबांनी आपल्या ट्रस्टतर्फे मदतीचा पहिला हात पुढे केला. मोठय़ा कंपन्यांशी संवाद साधला. त्यांनी मदतीचा हात पुढे केला. त्यानंतर काम सुरू झाले. आज जवळ जवळ 113 तलाव जलसंजीवन प्रकल्पामुळे तुडुंब भरून वाहत आहेत. या तलावांचा तिन्ही तालुक्मयातील जनता लाभ घेत आहे. हल्याळ तालुक्मयात जवळपास 94 तलाव पुनर्जीवित झाले आहेत. हे सर्व तालुका वन प्रधान असल्याने तलावातील पाण्याने प्राण्यांच्या पाण्याचा मार्गही मोकळा झाला आहे.
विकासात अनेकांचा हातभार
गेल्या काही काळात व्हीआरडीएम ट्रस्ट, कॅनरा बँक देशपांडे आरसेटी यांनी तलाव सफाईचे काम हाती घेतले. त्या कामात इन्फोसिस फाउंडेशन, जेसीबी इंडिया, जे एस डब्ल्यू फाउंडेशन, टाटा मोटर्स, टाटा हिटाची, स्थानिक इआयडी प्यारी, वेस्ट कोस्ट पेपर मिल यांची मोलाची साथ मिळाली. तलाव शुद्धीकरण आणि साफसफाई झाल्यामुळे गावात आता नवचैतन्य निर्माण झाले आहे.
तलाव खोलबंदीमुळे मुरुकवाडचे स्वरूप पालटले
मुरूकवाड येथील 28 एकरातील मोठा तलाव जेव्हा दुथडी भरून वाहू लागला, तेव्हा गावचे स्वरुपच बदललेले, शेतात डोलणारे ऊसपीक, गावकऱयांना मिळालेले पाणी त्यामुळे लोकांच्या चेहऱयावर समाधान पसरले. हा तलाव म्हणजे ’श्री सत्पुरुष देवाचा तलाव’ नावाप्रमाणेच या तलावाने कृपेचा वर्षाव केला.
या तलावात आता मासे सोडले आहेत. या जलसंपत्तीमुळे गावाला फायदा होतो. त्यातून काही लोकोपयोगी कामे होतात. शेतात दोन पिके घेता आल्याने शेतकरीही सुखी-समाधानी झाले आहेत. त्यांची आर्थिक स्थिती सुधारली आहे. याचे सर्व श्रेय आर. व्ही. देशपाडे साहेबांना जाते.
काळगिनकोपमधील पाण्याचा प्रश्न मार्गी
काळगिनकोप येथील तीनशे कुटुंबांना या प्रकल्पामुळेच भक्कम आधार मिळाला आहे. तेथील श्री. पिसेलिंगेश्वर देवाच्या तलावांचे पुनरुज्जीवन झाले. शेती सुधारली, पिण्याच्या पाण्यासह दैनंदिन पाण्याचा प्रश्न सुटला.गावकरी पदोपदी देशपांडे साहेबांचे आभार मानतात. त्यांच्या प्रयत्नामुळेच त्यांना हे दिवस पाहायला मिळाले, अशी प्रतिक्रियाही व्यक्त करतात. या प्रकल्पाचा फायदा तिन्ही तालुक्मयाला झाला आहे. विकसित केलेले तलाव सतत पाण्याने भरलेले असावे म्हणून देशपांडे साहेबांनी काळी नदी योजना राबवण्याचा अथक प्रयत्न केला. काळी नदीला 12 महिने पाणी असते. या नदीचे पाणी या सर्व तलावाना मिळावे म्हणून ही योजना राबवण्यात येत आहे.
82 नवीन शेततळय़ाची निर्मिती
जलसंजीवनी प्रकल्पात शेतकऱयांसाठी आणखी एक योजना राबवली. जो शेतकरी आपल्या शेतात लहान तळे करण्यास उत्सुक असेल त्याला मदत करण्याचीही योजना राबवण्यात आली. या योजनेत शेतकऱयांच्या सहाय्याने जवळ जवळ 82 छोटी तळी निर्माण झाली. त्यामुळे शेतकऱयांचा पाण्याचा त्रास बऱयाच प्रमाणात कमी झाला. एकूणच हा प्रकल्प पाहता देशपांडे साहेबांची जिद्द वाखाणण्यासारखी आहे. निसर्गाच्या अडथळय़ातून वाट काढत सर्व समावेशक कार्यक्रम हाती घेऊन समाजाला प्रगतीपथावर घेऊन जाणारा जनतेचा नेता विराळाच. आर. व्ही. देशपांडे साहेबासारखे अविरत काम करणारे लोकप्रतिनिधी प्रत्येक भागात असतील तर गावांचे नंदनवन होण्यास वेळ लागणार नाही.
शेतकऱयांचा सहभाग हे या प्रकल्पाचे वैशिष्टय़
तलाव शुद्धीकरण आणि गाळाचा निचरा हे काही सहज सुलभ काम नव्हते. पण देशपांडे साहेबांनी जनतेचा सहभाग घडवून आणला. गाव पातळीवर सभा घेतल्या, वारंवार कामाची पाहणी केली. शेतकऱयांचा सहभाग हे या प्रकल्पाचे वैशिष्टय़ होते. उपसा केलेला चिखल, माती, शेतकऱयांनी स्वच्छेने आणि स्वखर्चाने आपल्या शेतात नेली.
त्यामुळे शेत जमिनीचा कस वाढला, जमीन शक्तिमान झाली, सुपिकतेने आता शेतकऱयांच्या पिकात वाढ झाली. मोठय़ा प्रमाणात तलावाचे पुनर्जीवन झाले. त्यामुळे जमिनीतील पाण्याची पातळी वाढली. आणि वर्षानुवर्षे आडून गेलेल्या कूपनलिका पुन्हा सुरू झाल्या. गावकऱयांना पाणी, शेताला पाणी, गाई-म्हशींना व जंगली प्राण्यांना पाणी मिळाले. आणि जमिनीतील पाण्याची वाढ असा चौफेर फायदा जलसंजीवन प्रकल्पामुळे झाला.









