कोरोनाच्या वाढत्या रुग्णांदरम्यान जर्मनीत कठोर निर्बंधासह टाळेबंदी वाढविली आहे. कोरोनावर नियंत्रण मिळविण्यासाठी 31 जानेवारीपर्यंत देशव्यापी टाळेबंदीला मुदतवाढ दिली जात आहे. हा निर्णय प्रांतीय गव्हर्नरांच्या सूचनांनुसार घेण्यात आल्याचे चॅन्सेलर अँजेला मर्केल यांनी सांगितले आहे. जर्मनीत मागील वर्षी 2 नोव्हेंबरपासून टाळेबंदी लागू करण्यात आली होती. यादरम्यान रेस्टॉरंट, बार आणि सर्व क्रीडासुविधा बंद ठेवण्यात आल्या होत्या. कोरोनावर नियंत्रण न आल्याने टाळेबंदीची जानेवारीच्या पहिल्या आठवडय़ापर्यंत मुदत वाढविण्यात आली होती. यादरम्यान अनावश्यक दुकाने, शाळेसह सामाजिक संपर्कावरही बंधने लादण्यात आली होती.
जर्मनीत दिवसभरात 11 हजारांहून अधिक रुग्ण सापडले असून 944 जणांना जीव गमवाव लागला आहे.









