वृत्तसंस्था/ प्रँकफर्ट
कोव्हिड-19 महामारीमुळे जर्मनीतील सर्व क्रीडास्पर्धा स्थगित किंवा लांबणीवर टाकण्याचा निर्णय यापूर्वी घेण्यात आला आहे पण जर्मनीत प्रसिद्ध असलेल्या बुंदेस्लीगा फुटबॉल स्पर्धेला मे महिन्याच्याअखेरीस बंदीस्त स्टेडियममध्ये प्रारंभ करण्याची योजना आखली आहे. सध्या कोरोना व्हायरस प्रसार जर्मनीत झपाटय़ाने होत असल्याने या स्पर्धेच्या फेरप्रारंभ योजनेबाबत साशंकता व्यक्त केली जात आहे.
कोरोना महामारीमुळे जर्मनीतील फुटबॉल क्षेत्रासमोर मोठी आर्थिक समस्या निर्माण झ्घली आहे. जर्मनीतील 36 फुटबॉल क्लबची आर्थिक स्थिती अत्यंत नाजूक झाली असून प्रथम आणि द्वितीय विभागीय फुटबॉल स्पर्धा पुन्हा सुरू केल्या तर या क्लबच्या आर्थिक स्थितीत थोडा बदल होवू शकेल, असे जर्मनीतील राजकीय नेत्यांना वाटते. मात्र बुंदेसलीगा स्पर्धा बंदीस्त स्टेडियममध्ये चालू महिन्यांच्या अखेरीस सुरू करण्याचा निर्धार जर्मनीच्या फुटबॉल फेडरेशनने व्यक्त केला आहे.









