वृत्तसंस्था/ कोलॉन
एटीपी टूरवरील येथे सुरू असलेल्या पुरुषांच्या इनडोअर कोलॉन खुल्या आंतरराष्ट्रीय टेनिस स्पर्धेत जर्मनीच्या अलेक्झांडर व्हेरेव्हकडून स्पेनच्या फर्नांडो व्हर्डेस्कोला हार पत्करावी लागली. प्रेंच ग्रॅण्डस्लॅम स्पर्धेत झालेल्या वादग्रस्त सामन्यानंतरचा व्हर्डेस्कोचा हा पहिला पराभव आहे.
गुरुवारच्या सामन्यात व्हेरेव्हने व्हर्डेस्कोचा 6-4, 6-1 असा पराभव केला. नुकत्याच झालेल्या प्रेंच ग्रॅण्डस्लॅम टेनिस स्पर्धेत व्हेरेव्ह आणि व्हर्डेस्को यांच्यातील सामना वादग्रस्त ठरला होता. अमेरिकन ग्रॅण्डस्लॅम टेनिस स्पर्धेत उपविजेतेपद मिळविणाऱया जर्मनीच्या अलेक्झांडर व्हेरेव्हला या सामन्यापूर्वी ताप असतानाही स्पर्धा आयोजकांनी प्रवेश दिला होता. या कारणामुळे व्हर्डेस्कोने नाराजी व्यक्त केली होती. पण व्हेरेव्हने पुन्हा वैद्यकीय तपासणी करवून घेतली आणि त्यामध्ये त्याला कोरोनाची बाधा झाली नसल्याचे स्पष्ट झाले होते. आता कोलॉन स्पर्धेत व्हेरेव्हचा दुसऱया फेरीतील सामना दक्षिण आफ्रिकेच्या लॉईड हॅरिसबरोबर होणार आहे.









