वृत्तसंस्था/ हरझोगेनॉरॉच
जर्मनी संघातील आघाडीफळीत खेळणारा अनुभवी फुटबॉलपटू थॉमस मुलेर याला दुखापत झाल्याने तो बुधवारी होणाऱया युरो चषक फुटबॉल स्पर्धेतील हंगेरी बरोबरच्या सामन्यात खेळू शकणार नाही, असे जर्मनीच्या संघ व्यवस्थापनाकडून सांगण्यात आले.
या सामन्यासाठी जर्मनी संघाचा सराव सुरू असताना मुलेर या दुखापतीमुळे त्यात सहभागी झाला नव्हता. मुलेरच्या गुडघ्याला दुखापत झाली असून ती पूर्णपणे बरी झालेली नाही. युरो चषक फुटबॉल स्पर्धेतील गेल्या शनिवारी पोर्तुगालबरोबर झालेल्या सामन्यात मुलेरच्या गुडघ्याला दुखापत झाली होती. जर्मनीने या सामन्यात बलाढय़ पोर्तुगालचा 4-2 असा पराभव केला होता.









