वृत्तसंस्था/ ऍकापुल्को
एटीपी टूरवरील मेक्सिकोतील शनिवारी झालेल्या ऍकापुल्को हार्डकोर्ट पुरूषांच्या आंतरराष्ट्रीय टेनिस स्पर्धेतील पुरूष एकेरीचे जेतेपद जर्मनीच्या द्वितीय मानांकित अलेक्झांडर व्हेरेव्हने पटकाविले. अंतिम सामन्यात व्हेरेव्हने ग्रीकच्या टॉप सीडेड सिटसिपेसचा पराभव केला.
एटीपीच्या ताज्या मानांकन यादीत सध्या सातव्या स्थानावर असलेल्या व्हेरेव्हने अंतिम सामन्यात सिटसिपेसचा 6-4, 7-6 (7-3) असा पराभव केला. व्हेरेव्हचे एटीपी टूरवरील हे 14 वे तर 2021 च्या टेनिस हंगामातील पहिले विजेतेपद आहे.









